जाता जाता संदेश देऊन जाणारे….’फकाट’
शिक्रापूर हे गावं असून त्यागावातील प्रत्येक घरात एक तरी फौजी असतो आणि म्हणूनच या गावचे नाव होते फौजी शिक्रापूर.
मात्र याला गालबोट असते ते सलीम (हेमंत ढोमे) व (राजू) सुयोग गोऱ्हे या दोन मित्रांचे अख्खा दिवस दारू प्यायची आणि टवाळक्या करायच्या हेच काम.
या गावात एक मेजर नाईक (अविनाश नारकर) सुद्धा राहत असतो पण युद्धात पाय गमावून बसला असतो व त्याला पैशाची प्रचंड गरज असते म्हणून तो एल ओ सी सिक्रेट ही कथा लिहितो व निर्मात्याच्या शोधात असतो त्याबदल्यात त्याला चांगली किंमत हवी असते पण त्याच्या बायकोच्या नजर चुकीने त्याने गोळा केलेली कागदपत्रे कुरियर वाल्याला दिले जाते
राजू व सलीम मिल्ट्री मध्ये भरती होण्यासाठी पुण्याला येतात मात्र त्यांची तिथे डाळ शिजत नाही. म्हणून मग राजू कॅब चालवतो व सलीम कुरियर वाला बनतो.
मेजर ने लिहिलेले कॉन्फिडेनशियल इंडियन आर्मीचे सिक्रेट ही कथा विकण्यासाठी लिहून ठेवतो मात्र चुकून ते कागद डिलिव्हरी बॉय कडे दिले जातात
राजूला ते कागद म्हणजे खरे मिल्ट्रीचे गुपित वाटतात व तो ते कागद दहशतवाद्यांना विकून भरपूर पैसे कमावण्याची कल्पना सलीमला सांगतो प्रथम न पटलेली ही गोष्ट सलीमला नंतर पटते.
राजू, सलीम व मेजर नाईक तिघे डिलिंग करावयास जातात पण मेजर यांनी सगळी माहिती मराठीत लिहिलेली असल्याने काश्मीर मध्ये ते वाचावयास कोणालाच येत नाही.
इथे मेजर राजुला व सलीमला सांगतो ते एल ओ सी सिक्रेट नसून ती चित्रपटाची स्टोरी असून मी लेखक आहे. हे ऐकून दोघेही अवाक होतात.
त्या दहशतवाद्यांच्या तावडीतून मेजर, सलीम व राजू यांची सुटका होते का?
मात्र हे सर्व बघण्यासाठी प्रेक्षकांना आपले डोके बाजूला काढून ठेवावे लागणार आहे आणि असे केले तरच ते चित्रपट एन्जॉय करू शकतील.
दिग्दर्शक श्रेयस जाधव यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत मात्र तरीही चित्रपट अजून चांगला बनला असता.
पार्श्व संगीत खूप लाऊड झाले आहे. सर्वच कलाकारांनी कामे चांगली केली असून.
हेमंत ढोमे ला एक मित्रत्वाचा सल्ला, तू एक चांगला अभिनेता आहेस, आता लहान मुला सारखे बोलणे सोडून एका नॉर्मल माणसा सारखे बोल.