दिल है छोटासा, छोटीसी आशा – बटरफ्लाय
सचिन चिटणीस या चित्रपटाला मिळत आहेत साडेतीन स्टार ( 3.5 )
आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी एक स्वप्न दडलेलं असतं अगदी लहानपणापासून व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो आणि समजा आपल्याला या प्रयत्नांना यश आले तर आपलं जीवन सार्थक झाले असे वाटून जाते एक छोटंसं स्वप्न पण माणसाच्या आयुष्यात किती बदल घडू शकतो याचे उदाहरण म्हणजे बटरफ्लाय…..
प्रत्येक घरातली होममेकर आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र धडपडत असते. पण तिचीही काही स्वप्नं असतात. कामाच्या धावपळीत तिची स्वप्नं मागे पडतात. पण एक ना एक दिवस आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते ज्यामुळे तिचे दैनंदिन आयुष्य बदलून जाते. आणि मग आपण सापडलेल्या या नवीन वाटेला आणि स्वतःला अधिक प्राधान्य देतो, आणि मग आपलं जीवन सार्थक झाले असे वाटून जाते एक छोटंसं स्वप्न पण माणसाच्या आयुष्यात किती बदल घडू शकते याचे उदाहरण म्हणजे बटरफ्लाय…..
मेघा (मधुरा वेलणकर साटम ) जी विराजची ( अभिजीत साटम ) याची कर्तव्यदक्ष पत्नी आहे. ती नवरा , मुलगी व सासरे ( प्रदीप वेलणकर ) यांची पुरेपूर काळजी घेत असते, त्यांना हवे नको ते सर्व पाहत असते. एक आदर्श सुखी कुटुंब म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते मात्र या सर्व संसारिक कोलाहलात मेघाचे बालपण, तिची स्वप्ने मात्र हरवून जातात आणि एका वळणावर तिची बालपणीची स्वप्ने तिच्या समोर उभी राहतात.
संसार का स्वप्ने या कात्रीत मेघा अडकते मात्र तिच्या आयुष्यात एक असा इसम येतो की तो तिला या सर्वांन मधून अलगद बाहेर काढतो, आता हे कसे शक्य होते, नक्की तो इसम कोण आणि का म्हणून मेघाच्या आयुष्यात येतो. तो तिला समर्पणाचे मूल्य शिकवतो पण त्यामुळे घरगुती गैरसमज वाढतात
आणि मेघाचं दुहेरी आयुष्य नियंत्रणाबाहेर जातेय असे वाटत असतानाच……….
पुढील रंजक गोष्ट मोठ्या पडद्यावर बघण्यात खरी मजा आहे. हा चित्रपट मनाला उबदारपणा देण्यात यशस्वी ठरतो.
उत्कृष्ठ संवाद चित्रपटाला ताजेपणा देतात.
चित्रपट भव्य दिव्य न करता एक साधेपणाने सरळ रेषेत जाणारा असल्याने तो मनाला अधिक भावतो. यात दिग्दर्शक मीरा वेलणकर यांचे कसब आहे. अभिजीत साटम याचा उत्कृष्ठ अभिनय त्याला मिळालेली मधुराची उत्तम साथ तर आपल्या अभिनयात एकदम फिट बसलेला महेश…. क्या बात.
फुलपाखराच्या आशावादात श्वास घ्या.