सचिन चिटणीस…….
( चित्रपटाला मिळताहेत ४ स्टार )
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा चित्रपट १४ जानेवारीला मोठया पडद्यावर प्रदर्शित होत आहे. मोठ्या पडद्यावरील आतापर्यंत आलेल्या चित्रपटापैकी सर्वात बोल्ड चित्रपट म्हणून याची इतिहासात नोंद होईल यात काही शंका नाही.
चित्रपटात काय नाही, बोल्डनेस, हिंसा, भाषा, अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, कॅमेरा या सर्व दृष्टीने उजवा असलेला असा हा सिनेमा आहे, मात्र प्रेक्षकांनी तो ३० वर्षांपूर्वी गिरण्या बंद झाल्या नंतर गिरणी कामगारांची जी ससेहोलपट झाली त्यांच्या दृष्टीने हा चित्रपट बघणे आवश्यक आहे.
थोडक्यात हा चित्रपट मनोरंजनासाठी नाही तर गिरणी कामगारांची बिल्डर, गुंड व राजकारणी लोकांनी आपल्या फायद्यासाठी कशी राखरांगोळी केली त्याचे साक्षीदार बनण्यासाठी बघावा.
हा चित्रपट थेटरात जाऊन बघण्याने जो मनाला जाळणार नाही तर अधिक भावेल. तर प्रेक्षकहो काहीतरी वेगळे विचाराने अधिक प्रगल्भ व्हावयाचे असल्यास ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा जयंत पवार यांची कथा व संवाद असलेला व महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट जरूर बघावा.
‘न बघता नावे ठेवण्यापेक्षा, बघून नावाजा’
*नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा*
पटकथा- संकलन- दिग्दर्शक स्वतः महेश मांजरेकर यांनी केले असून या विषयावर चौकट मोडून असा चित्रपट प्रेक्षकां समोर ठेवायचे धाडस हे फक्त महेश मांजरेकरच करू शकतात.त्यांनी केलेले दिग्दर्शन उत्कृष्ठ, कथा-संवाद – स्वर्गीय जयंत पवार यांचे असून ते मनाला भिडतात, उत्तम छायाचित्रण – करण बी. रावत, कला – प्रशांत राणे, परिणामकारक संगीत-पार्श्वसंगीत – हितेश मोडक, निर्माते – नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत तर सह-निर्माते – विजय शिंदे.
कलाकार
दिग्याच्या भूमिकेत प्रेम धर्माधिकारी यांनी केलेला नितांत सुंदर अभिनय त्याला त्याच जोडीचा मिळालेला वरद नागवेकरचा इलियास.
बयच्या भूमिकेत छाया कदम यांनी पाडलेली छाप तर शशांक शेंडे यांचा उत्तम बाबी.
शिऱ्या – रोहित हळदीकर, तर बोल्ड भूमिकेत सहज वावरलेली कश्मिरा शाह ( सुप्रिया )
यांना योग्य साथ दिलेले, महादेव – अतुल काळे, काकू – अश्विनी कुलकर्णी, नगरसेवक गावडे – उमेश जगताप, भक्त्या – गणेश यादव, गुप्ता – गणेश रेवडेकर, याकूब – नुपूर दुधवडकर.