केदार, सुरजची ‘झापूक झुपूक’ गोष्ट 

केदार सुरजची ‘झापूक झुपूक’ गोष्ट

स्टार — 3.5

‘झापूक झुपूक’ केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात केदारने सोशल मीडिया रीलस्टार ‘टिकटॉक’च्या व्हिडिओपासून ‘बिग बॉस मराठी’च्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला  गुलीगत सुरज चव्हाण ला मोठ्या पडद्यावर आणण्याचे जे धाडस केले आहे ते नक्कीच वखाण्याजोगे आहे कारण नायकपदाच्या रूढ चौकटीत न बसणाऱ्या सुरजला हिरो पाहणे हे काही लोकांना पचेल तर काही लोकांना बिलकुल पचणार नाही. मात्र तरीही सुरज चव्हाण ला शब्द दिल्यामुळे केदारने सूरजला घेऊन ‘झापूक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांपुढे ठेवला आहे. आणि आता तो चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर झळकतोय.

एका गरीब कुटुंबातील अशिक्षित तरुण एक स्वप्न पाहतो आणि त्याच्या स्वप्नांचे काय होते… त्याच्या मनामध्ये कशा प्रकारे आशाआकांक्षा निर्माण होतात, हेच या चित्रपटामध्ये मांडण्यात आले आहे.

सूरज (सूरज चव्हाण) हा एक अशिक्षित तरुण. तो एका शाळेत शिपाई म्हणून काम करीत असतो. या शाळेचे संस्थाचालक आमदार पंजाबराव पाटील (मिलिंद गवळी) असतात. त्यांची एकुलती एक मुलगी नारायणी (जुई भागवत) ही शहरामध्ये शिकून आपल्या घरी आलेली असते. तिला आता शिक्षिका बनायचे असते आणि आपली ही इच्छा ती आपल्या वडिलांकडे व्यक्त करते. तिचे वडील तिला आपल्याच शाळेत शिक्षिका म्हणून पाठवितात. शाळेतील मुख्याध्यापक जांभळे सर (पुष्कराज चिरपुटकर) तिचे स्वागत करतात. अतिशय सुंदर आणि देखण्या शिक्षिकेला पाहताच सूरज तिच्याकडे आकर्षित होतो. तिच्यावर एकतर्फी प्रेम करून लागतो.

खरं तर भुतकाळात अर्थात शाळेत शिकत असताना नारायणीचे प्रेम शेखर (इंद्रनील कामत) वर असते. शेखर हा उत्तम चित्रकार असतो. त्यांच्या प्रेमाचे धागे विणले जात असतानाच एका घटनेमुळे नारायणी गाव सोडून शहरात शिक्षणासाठी निघून जाते आणि आता ती आपल्या गावात पुन्हा परतलेली असते. मग तिच्याकडे आकर्षित झालेल्या सुरजचे काय होते….शेखरला आपल्या भुतकाळातील प्रेम पुन्हा मिळते का… या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

या चित्रपटामध्ये मैत्री, प्रेम. स्वप्न, भावभावना यांचे सुरेख मिश्रण त्याने केले आहे. परंतु हा चित्रपट पकड घेत नाही. तरीही डोके बाजूला ठेवल्यास हा चित्रपट आपण एन्जॉय करू शकतो.

सूरज चव्हाण, जुई भागवत, पायल जाधव, दीपाली पानसरे, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपूटकर आदी कलाकारांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. पुष्कराजने चित्रपटामध्ये आपल्या परीने हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या भूमिकेला निश्चितच दाद द्यावी लागेल. सूरजचा गावरान पॅटर्न काही जणांना भुरळ घालणारा असला तरी खरी कमाल केली आहे ती जुई भागवतने. तिने नारायणीच्या भूमिकेतील विविध बारकावे पडद्यावर उत्तम प्रकारे सादर केले आहेत.

चित्रपटातील गाण्यांचा बाज काहीसा वेगळा असून छान जमून आला आहे. ह्या गाण्याचे बोल प्रतीक बोरकर यांनी लिहिले असून क्रेटेक्सने झापुक झुपूक गाण्याला संगीत दिले आहे.

सिनेमॅटोग्राफर्सनी कमाल केली असून चित्रपट प्रसन्न वाटतो.

IPRoyal Pawns