*पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमिर खान यांच्यात झाला भावनिक संवाद; म्हणाले,”….. कशी आहे?”*
अलीकडेच झालेल्या एका महत्त्वपूर्ण कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यात घडलेला एक भावस्पर्शी संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रसंगाने उपस्थित सर्वांची मनं जिंकली आणि पंतप्रधान मोदींच्या आत्मीयतेचा व खऱ्या अर्थाने ‘जननेते’ असल्याचा प्रत्यय दिला.
या कार्यक्रमात उपस्थित एका सूत्रधाराने सांगितले की, “कॉन्क्लेव्हदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमिर खान यांची भेट झाली. तेव्हा पंतप्रधानांनी आमिरला विचारले, ‘तुझी अम्मी कशी आहे?’ यावर आमिरने हसत उत्तर दिलं, ‘ती ठिक आहे सर.’ त्यावर पंतप्रधान म्हणाले, ‘आपली शेवटची भेट झाली होती तेव्हा तू सांगितलं होतंस की तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले आहेत.’ आमिरने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, ‘हो सर, पण आता ती पूर्णपणे बरी आहे.’”
हा संवाद ऐकून उपस्थित प्रेक्षक भावूक झाले. पंतप्रधानांनी एका कलाकाराच्या आईच्या तब्येतीची पूर्वीच्या भेटीतून आठवण ठेवणं, ही गोष्ट त्यांच्या संवेदनशीलतेचं आणि मन:पूर्वक व्यक्तींना लक्षात ठेवण्याच्या वृत्तीचं प्रतीक ठरली.
या विषयी उपस्थित सूत्रधाराने सांगितले, “या संवादाने संपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा पसरली. पंतप्रधान मोदी यांनी कोणाशी भेटताना केवळ औपचारिकता न करता, प्रत्यक्ष आत्मीयतेने आणि स्मरणशक्तीने संवाद साधणे हे अनेकांच्या मनात घर करून गेले.”
दरम्यान, आमिर खान आता ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटात दिसणार असून, त्यात जेनेलिया देशमुख देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.