सचिन चिटणीस……..या चित्रपटाला मिळत आहेत 2.5 स्टार
“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी” या एका वाक्यातच आईची महती कळते. आई ह्या शब्दामध्येच प्रेम, जिव्हाळा, माया, ममता, अश्या अनेक भावना दडलेल्या आहेत.
इतिहासात अश्याच एका आईच्या प्रेमाची कथा दडलेली आहे आपल्या बाळासाठी प्राणपणाला लावणाऱ्या आईची गोष्ट आणि हीच कथा दिग्दर्शक प्रसाद ओक याने ‘हिरकणी’ मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मी इथे मुद्दामहून प्रयत्न हा शब्द वापरला असून त्याचे कारणही तसेच आहे. जरी कथा ऐकतांना खूप उत्सवावर्धक, साहसी वाटत असली तरी मुळातच कथेचा जीव फार छोटा आहे. त्यामुळे आपल्या गडाच्या खाली गावातील घरात राहिलेल्या लेकरांच्या आठवणीने व किन्हीसांजा झाल्यावर गडाचे दरवाजे बंद झाल्याने व हे दरवाजे आता एकदम सकाळी उघडणार असल्याने व्याकुळ झालेल्या आईने घेतलेला पश्चिम कडा येथून गड उतरण्याचा निर्णय जो आज पर्यंत कोणालाही जमला नाही म्हणूनच पश्चिम तटावर आज पर्यंत कधी बुरुज बांधण्यात आला नव्हता.
मात्र हिरकणी आपल्या बाळासाठी तोच कठीण मार्ग उतरून घरी जाते अशी कथा असलेला हा चित्रपट दिग्दर्शस्क म्हणून प्रसाद ओक यांना म्हणावा तितका पेलता न आल्याने चित्रपटातील उत्सुकता निघून जाते, खोटा खोटा कडा, खोटे दगड, खोटा लांडगा हे फार आजच्या व्हीएफएक्स च्या जमान्यात पटत नाही.
हिरकणी चित्रपटाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंट आणि राजेश मापुस्कर यांनी केली असून दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले आहेत. संगीत अमितराज, छायाचित्रण – संजय मेमाणे यांनी सांभाळले असून यामध्ये सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, विमल म्हात्रे, मेहुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हिरकणीची व्यक्तिरेखा सोनाली कुलकर्णीने चांगली केली आहे. जीवाजी ची भूमिका अमित खेडेकर यांनी उत्तम सादर केली आहे.
अमितराज चे संगीत चांगले जमून आले आहे. चित्रपटातील गांनी उत्तम झाली आहेत. कला-दिग्दर्शक संतोष फुटाणे आणि वेशभूषा पोर्णिमा ओक यांनी त्यांचे काम चोखपणे केलेले आहे.