सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे – जयंत पाटील

*शेअर मार्केट पडले, इंधनाचे दर वाढले, घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले…*

*सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची टीका*

सांगली:- केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी वाढवली तसेच गॅस सिलिंडरचे दरही वाढवले. यामुळे महागाई वाढून सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भूर्दंड पडला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात, आज सकाळीच शेअर मार्केट गडगडले आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्याचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर २ रुपये एक्साईज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलही महाग होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही ५० रुपयांची वाढ झाली आहे. उद्यापासून नवीन किमती लागू होणार आहे. सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे. त्यात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे असे ते म्हणाले

https://x.com/Jayant_R_Patil/status/1909265923334087000?t=zPGhBlaoUwKYMMiwaWUUZA&s=19

IPRoyal Pawns