….आणि एखाद्या देवीसारखं माणिक बाईंच कपाळ मळवटाने भरले होते – शैलजा  दातार 

….आणि एखाद्या देवीसारखं माणिक बाईंच कपाळ मळवटाने भरले होते – शैलजा  दातार

ज्येष्ठ गायिका व माणिक वर्मांच्या शिष्या शैलजा दातार यांना तो अनुभव सांगताना अक्षरशः गहिवरून आले.

बाई मोठ्या आजारातून उठल्यानंतर त्यांचा दुसरा कार्यक्रम तुळशी बागेत होता. तुळशी बागेत असलेल्या राम मंदिरातील लोकांनी जसा विविध लोकांनी बाई लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून इतक्या लोकांनी इतके नवस बोलले होते की काय बोलू नका, तसेच राम मंदिर मधील लोकांनी सुद्धा नवस बोलला होता की बाई बऱ्या झाल्यावरती त्यांना आम्ही तुळशीबाग येथे या राम मंदिरात आणू व त्यांच्याकडून रामाची सेवा म्हणून एखादं गाणं गाऊन घेऊ.

तुळशीबागेत असलेल्या कार्यक्रमासाठी बाईंकडून मला निरोप आला की तुळशीबाग येथे  येताना दोन तंबोरे घेऊन ये. बाईंच्या बरोबरीने कार्यक्रम करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.

इतकी गर्दी झाली होती की संपूर्ण आवार भरलं होतं आणि बाईंना भेटायला लोक अधिक उत्सुक होते. सकाळची वेळ होती बाई शुद्ध शरण गायल्या मग घडी घडी शुद्ध चरण तुझे आठवते रामा नंतर विजय पताका श्रीरामाची, साडेअकराला गाणं संपलं, भैरवी गाण्याच्या अगोदर मात्र तुळशीबाग वाल्यांनी प्रेक्षकांना सांगितल्या बाई नुकत्याच मोठ्या आजारातून बाहेर आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही रांग करून या त्यावेळेस इतक्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, एक रांग पुरुषांची तर एक रांग बायकांची.

पुरुषांच्या हातात गुच्छ, सुकामेवा बर्फी पेढे तर बायकांच्या हातात आपण देवीच्या दर्शनाला जाताना जसं ताट नेतो बायकांच्या हातात तसेच ताट, इतकं कलाकारावरती प्रेम मी आज पर्यंत कोणाचही बघितलं नाही.

एक एक बायका यायच्या बाईंच्या कपाळावर हळद-कुंकू लावायचा डोक्यावर अक्षता व्हायच्या व फुलाची वेणी द्यायच्या आणि खणा नारळाने त्यांची ओटी भरायच्या आणि बायकांनी व पुरुषांनी आणलेलं सगळं सामान बाई मागे द्यायच्या म्हणजे आमच्याकडे त्याचा एक भला मोठा ढीग झाला होता. गाणं दीड तास झालं मात्र त्याच्यानंतर बाईंचं पूजन हे दीड एक तास चाललं, हे सगळं संपलं तेव्हा बाईंचं कपाळ मळवटाने भरलं होतं त्यांची मोठी वहिनी कपाळ पुसत होती तर मालूमावशी डोक्यातील अक्षता काढत होत्या.

संसार करून गाणं शिकणं हीच बाईंची शिस्त होती.

बाई सांगायच्या शास्त्रीय संगीत हे ४० मिनिटांपेक्षा जास्त गायचं नाही, नाहीतर मग तोच तोच पणा येतो.

बाईंचे एकच तत्व होतं स्वरांना शरण गेल्याशिवाय गाणं होत नाही.

बाईंच्या चारी मुली बाईंची अतिशय काळजी करायच्या त्यामुळे त्यांना विविध अटींवरती पाठवायच्या पण एकदा डेक्कन क्वीन मध्ये बसल्यानंतर बाई मला म्हणायच्या शैला तो तक्ता जरा बाजूला ठेव, काय आहे तरुणपणात मी गाणं गायला सुरुवात केली त्यामुळे मला पथ्य, मग भलं मोठं आजारपण म्हणून पथ्य, नंतर आता म्हातारपण म्हणून पथ्य आता खायचं तरी केव्हा मी, आपण आता असं करूया कर्जत आलं की एक एक बटाटा वडा खाऊया आणि त्यावर गरमागरम चहा पिऊयात म्हणजे काही होणार नाही.

IPRoyal Pawns