• *”वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती”*
*आणि “ग्रंथालय समिती” वर*
*विधानपरिषदेच्या मा.उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची*
*”विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नियुक्ती*
मुंबई दिनांक 25 एप्रिल, 2025 (प्रतिनिधी / वार्ताहर)
महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पध्दतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. “वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती” आणि “ग्रंथालय समिती” वर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा.उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नामनियुक्ती करण्यात आली आहे.