25 C
Mumbai
Saturday, 18th January 2025

५ सप्टेंबर २०१९,
२०११ ला आम्ही ऑनलाईन पेपर सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ‘सिने मुहूर्त’ या नावाने पेपर सूरु झाला त्यावेळेस आम्हाला खूप लोकांनी सांगितले अरे इंटरनेट वापरून कोण पेपर वाचणार, मात्र झाले उलटे ‘सिने मुहूर्त’ ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मात्र फक्त चित्रपटाच्या बातम्या नकोत इतरही बातम्या येऊ द्या असे मेसेज वाचकांकडून येऊ लागले तेव्हा २८ जानेवारी २०१२ वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर ‘मुहूर्त न्यूज’ या पेपरचा जन्म झाला तो आज तागायत,
मात्र ५ सप्टेंबर २०१९ पासून आम्ही ‘मुंबई न्यूज 24×7’ नावाने पेपर चालू करत आहोत अर्थात ‘मुहूर्त न्यूज’ चे नाव आज पासून ‘मुंबई न्यूज 24×7’ असेल यात मराठी बरोबर इंग्रजीतही आम्ही बातम्या देणार आहोत. त्याच प्रमाणे ‘mumbainews24x7’ हे व्हाट्सअप्प बातमीपत्र देखील सुरू आहे तेही अगदी मोफत subscribe करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…..

Subscribe for NEWS on your whatsapp
https://mumbainews24x7.com/whatsapp

‘मुहुर्त न्यूज’ ला आपण दिलेला पाठींबा खरोखरच थक्क करणारा होता. असाच पाठींबा mumbainews24x7.com ला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आम्ही आमच्या रसिक वाचकांचे, जाहिरातदारांचे तसेच आम्हाला मदत करणाऱ्या बातमीदारांचे आणि अमेरिकेतील आमच्या मित्रांचे शतशः आभारी आहोत.

आपला
सचिन चिटणीस
मुख्य संपादक
———————————————————————————————————————————————————
नमस्कार,
muhurtnews.com  आता ENGLISH तसेच हिंदी मध्येही सुरु करण्यात आला असून MUHURTNEWS ची YOUTUBE वाहिनी देखील चालू झाली आहे त्याच्या लिंक खालील प्रमाणे …..
ENGLISH साठी……
http://en.muhurtnews.com/
हिंदी साठी …….
http://hi.muhurtnews.com/
YOUTUBE CHANNEL साठी……..
https://www.youtube.com/c/muhurtnews

धन्यवाद,
आपला
सचिन चिटणीस
मुख्य संपादक
www.muhurtnews.com
———————————————————————————————————————————————————
३० डिसेंबर २०१३

रविवार

नमस्कार,

आज तारीख ३० डिसेंबर २०१३ पासून muhurtanews.com मध्ये आम्ही काही बदल करत आहोत पूर्वीचा चेहरामोहरा बदलून त्या जागी नवीन आधुनिक पेपर सुरु करत आहोत. त्यासाठी आम्ही स्पेलिंग मध्ये थोडासा फरक केला आहे आता यापुढे www.muhurtanews.com या स्पेलिंग मधून आम्ही फक्त a हे अक्षर गाळले असून आपल्या आधुनिक पेपरचे स्पेलिंग पुढील प्रमाणे असेल.   www.muhurtnews.com

आपले आत्ता पर्यंत मिळालेले सहकार्य असेच पुढे मिळत राहील ही आम्हाला खात्री आहे, त्याच प्रमाणे आपणा कडून प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.

धन्यवाद,
आपला
सचिन चिटणीस
मुख्य संपादक
www.muhurtnews.com
———————————————————————————————————————————————-
२८ जानेवारी २०१२ – वसंत पंचमी

नमस्कार मित्रांनो,

वसंत पंचमीला आपल्या आशीर्वादाने आम्ही दुसरा इंटरनेट पेपर सुरु केला आहे त्याचे नाव ‘मुहूर्त न्यूज’. आपला ‘सिनेमुहुर्त’ला मिळालेला अभूतपूर्व पाठिंब्याच्या जोरावर आम्ही हे धाडस करण्याचे ठरवले, हो आणि त्याला कारणही तसेच होते आमच्या तमाम वाचकां कडून सतत सूचना येत होती ती म्हणजे “आम्हाला जनरल बातम्या ही हव्या आहेत आणि त्या पण चार ओळीच्या वरती नकोत. तुम्ही अशी बातमी लिहा कि ती आम्हाला चार ओळीतच कळली पाहिजे. ज्यांना बातमी मोठी वाचायची असेल त्यांनी ती आत मध्ये जाऊन वाचावी आणि पार अमेरिकेहूनही ही मागणी यावयास लागल्यावर मात्र आम्हाला स्वस्थ बसवेना मग त्याबद्दल विचार विनिमय सुरु झाले. अमेरिकेतील आमच्या उच्चपदस्थ मित्रांनी यात आम्हाला खूप मदत केली आणि अखेर वसंत पंचमीच्या शुभ मुहुर्ता वर मुहूर्त न्यूज चा जन्म झाला आणि टॅग लाईन ठरली “बातमी एका नजरेत”.

सिनेमुहुर्तला आपण दिलेला पाठींबा खरोखरच थक्क करणारा तर आम्हाला आपल्या समोर नतमस्‍तक करणारा आहे. असाच पाठींबा राहील अशी आम्हाला खात्री आहे आम्ही आमच्या रसिक वाचकांचे, जाहिरातदारांचे तसेच आम्हाला मदत करणाऱ्या बातमीदारांचे आणि अमेरिकेतील आमच्या मित्रांचे आम्ही शतशः आभारी आहोत.
आपला
सचिन चिटणीस
मुख्य संपादक
———————————————————————————————————————————————————
२८ जानेवारी २०१३
नमस्कार मित्रांनो ,
आज पासून बरोबर १ वर्षा पूर्वी म्हणजेच २८ जानेवारी २०१२ रोजी ‘मुहूर्त न्यूज’ चा जन्म झाला. आज मुहूर्त न्यूजचा प्रथम वर्धापन दिन साजरा करताना मनापासून आनंद होत आहे. मुहूर्त न्यूजच्या परिवारातर्फे वाचकांना ,जाहिरातदारांना , हितचिंतकांना मनापासून अभिवादन.लोभ आहेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो हीच साईंच्या चरणी प्रार्थना. आपला सचिन चिटणीस.