एअरटेलने जगातील पहिलेच ऑनलाईन फसवणूक रोखणारे फ्रॉड डिटेक्शन सोल्यूशन लाँच केले

*एअरटेलने जगातील पहिलेच ऑनलाईन फसवणूक रोखणारे फ्रॉड डिटेक्शन सोल्यूशन लाँच केले*

*ईमेल, ओटीटी आणि एसएमएससह सर्व कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर रिअल टाइममध्ये फसवणूक करणारे वेबसाइट्स शोधून ब्लॉक करणार*

*मुंबई, :* एअरटेलने स्पॅम विरुद्धच्या लढाईत पुढे जाऊन ऑनलाईन फसवणूक रोखणारे एक नवीन अत्याधुनिक उपाय सादर केला आहे जो ईमेल, ब्राउझर, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, एसएमएस इत्यादी ओव्हर-द-टॉप (ओटीटी) अॅप्स आणि प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणारे वेबसाइट्स शोधून ब्लॉक करेल. ही सुरक्षित सेवा एअरटेल मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी सुलभरीत्या संकलित आणि आपोआप सक्षम केलेली असेल आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च द्यावा लागणार नाही. एअरटेलच्या प्रगत सुरक्षा प्रणालीद्वारे फसवणूक करणारे म्हणून चिन्हांकित केलेल्या वेबसाइटवर प्रवेश करण्याचा एखाद्या ग्राहकाने प्रयत्न केल्यावर ओपन होणे ब्लॉक केले जाईल आणि ग्राहकांना ब्लॉकचे कारण समजावून सांगणाऱ्या स्क्रीनकडे पुन्हा नेले जाते.

ऑनलाइन फसवणुकीचा धोका प्रत्येक दिवस वाढत चालला आहे, कारण डिजिटल प्लॅटफॉर्म्स संपूर्ण देशभर सर्वत्र आढळत आहेत आणि ग्राहकांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अशा धमक्या भीतीदायक पद्धतीने वाढत चालल्या आहेत. ओ.टी.पी फसवणूक आणि फसव्या कॉल्सच्या फार पलीकडे जाऊन या फसवणुकीच्या योजना विकसित झालेल्या आहेत आणि लाखो व्यक्ती ऑनलाइन घोटाळ्यांना बळी पडलेले आहेत, असे अलीकडील अहवालात सांगण्यात आलेले आहे.

एअरटेलने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि एआय-संचालित, बहुस्तरीय गुप्तचर प्लॅटफॉर्म कार्यान्वित केले आहे ज्यास घोटाळे आणि फसवणुकीच्या संपूर्ण श्रेणीपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. सर्व प्लॅटफॉर्म्स वर डोमेन फिल्टर करणारे आणि डिव्हाइस मधील लिंक ब्लॉक करणारे अत्याधुनिक थ्रेट डिटेक्शन प्लॅटफॉर्म सादर करून ग्राहकांना सुरक्षित करण्याचा मानस कंपनीने ठेवलेला आहे.

या उपक्रमावर टिप्पणी करताना *गोपाल विट्टल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल* यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांमध्ये, संशय न घेणाऱ्या ग्राहकांना डोकेबाज गुन्हेगारांनी केलेल्या फसवणुकीमुळे त्यांनी कष्टाने कमावलेला पैसा गमवावा लागलेला आहे, अशा अनेक घटना आम्ही पाहिल्या आहेत. आमच्या अभियंत्यांनी प्रयत्न करून फसवणूक शोधणारा उपाय (फ्रॉड डिटेक्शन सोल्यूशन) या समस्येचे समाधान शोधलेले आहे. आम्ही मानतो की यामुळे आमचे ग्राहक फसले जाण्याची काळजी न करता पूर्णतः शांत मनाने इंटरनेटवर ब्राउझ करू शकतील. आमचे ए.आय वर आधारित साधन इंटरनेट ट्राफिक स्कॅन करते, वास्तविक काळात जागतिक रिपॉझिटरीज सह आणि धोका करणाऱ्यांच्या आमच्या स्वतःच्या डेटाबेससह तपासणी करते आणि फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स ब्लॉक करते. आमच्या उपायाने आत्ताच एक विलक्षण अचूकतेचा स्तर 6 महिन्यांच्या चाचण्यांमध्ये गाठला आहे. आम्ही जोपर्यंत आमचे नेटवर्क पूर्णपणे स्पॅम आणि स्कॅम पासून सुरक्षित बनवित नाही, तोपर्यंत निरंतर काम करत राहणार आहोत.”

IPRoyal Pawns