प्रगत युगातले काळेकुट्ट भीषण वास्तव….

प्रगत युगातले काळेकुट्ट भीषण वास्तव….

या चित्रपटाला मिळत आहेत 4 स्टार

या चित्रपटाची कथा स्मशानभूमीतील एका कुटुंबाभोवती फिरते. आजच्या प्रगत युगातही समाजाच्या काळ्याकुट्ट कोपऱ्यात दडलेले भीषण वास्तव दाखवण्याचे काम ‘पल्याड’ करेल. आजपर्यंत कधीही हाताळले गेलेले नसलेले काही अप्रकाशित मुद्दे वास्तववादी शैलीत मांडले आहेत. दर्शकांना आत्मपरीक्षण करायला लावेल असा हा चित्रपट आहे.

निर्माते पवन सदमवार, सूरज सदमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिव्हेट फिल्म्स आणि लावण्यप्रिया आर्ट्सच्या बॅनरखाली ‘पल्याड’ची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा सहितदार, सायली देठे, गजेश कांबळे, भरत रंगारी, बबिता उईके, रवी धकाते आणि सचिन गिरी यांच्या भूमिका आहेत.

रवींद्र शालिकराव बांधारे, गौरवकुमार वनिता पाटील, शिवशंकर रवींद्रनाथ निमजे, माया विलास निनावे, लक्ष्मण रवींद्रनाथ निमजे आणि रोशनसिंग बघेल हे सहनिर्माते आहेत. गीतकार प्रशांत माडपुवार आणि अरुण सांगोळे यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिली आहेत, तर सॅम ए.आर., जगदीश गोमिला आणि तुषार पारगावकर यांनी संगीत दिले आहे. अनन्या दुपारे, अवधूत गांधी, शमिका भिडे, सुस्मिता डावलकर आणि केतन पटवर्धन यांनी आवाज दिला आहे तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे आणि लोकेश कानिठी यांनी दिले आहे. छायांकन डीओपी मोहर माटे यांचे आहे

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची दखल अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली आहे. ‘फोर्ब्स’ने दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या मासिकात व ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मासिकाने एखाद्या मराठी चित्रपटाची दखल घेणे ही संपूर्ण मराठी चित्रपट सृष्ठीसाठी अभिमानाची बाब आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका आणि आजूबाजूच्या गावात झाले आहे.

के सेरा सेरा वितरणाद्वारे ‘पल्याड’ ४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns