…….जुळले 36 गुण

…….जुळले 36 गुण

( सचिन चिटणीस चित्रपटाला मिळत आहेत 4 स्टार )

प्रत्येकाला लग्न या प्रक्रियेतून, बंधनातून जावेच लागते याची पहिली पायरी असते ती म्हणजे मुला मुलीचे किती गुण जुळत आहे आणि त्यावरच लग्न करायचे की नाही हे आजही बऱ्याच घरात बघितले जाते आणि मग काही जणांचे छत्तीस गुण मिळत असतील तर तर मग काय बघायलाच नको. त्यांच्याकडे राम सीतेचा जोडा म्हणूनच बघितले जाते. पण हे छत्तीस गुण जुळत असले तरी दोन व्यक्तींना, कुटुंबांना त्याचबरोबर जबाबदाऱ्यांना जोडणारा हा अतिशय महत्वाचा काळ असतो. मात्र, लग्नपत्रिकेतले ‘36 गुण’ जुळूनही लग्नं यशस्वी होतात का? या प्रश्नाचे उत्तर हीच खरी या चित्रपटाची मेख आहे आणि समित कक्कड ने आजच्या पिढीचा हाच धागा बरोबर पकडत 36 गुण हा चित्रपट लोकांसमोर मांडला आहे.

रीतसर पत्रिका बघून लग्न केलेल्या सुधीर ( संतोष जुवेकर ) आणि क्रियाला ( पूर्वा पवार ) मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्या नात्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक? काय बरोबर? या व्दिधा मनःस्थितीत त्यांचं नातं जात.

लग्न प्रक्रियेत रितीरिवाज, प्रथा परंपरांबरोबरच दोन व्यक्तींची मतं आणि मन जुळणं किती महत्त्वाचं आहे. हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. दिग्दर्शक समित कक्कडने आजच्या पिढीतील लग्न झालेल्या आणि न झालेल्या तरूण पिढीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा रचली आहे. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाचे आपणास जाणवते. आणि त्याचमुळे हा चित्रपट आपले नुसते मनोरंजनच नाही तर एक चांगला संदेशही देऊन जातो.

अभिनेता संतोष जुवेकरला त्याच्या कारकिर्दीतला सर्वात बेस्ट रोल मिळाला असून संतोषने त्याचे सोने केले आहे. अभिनेत्री पूर्वा पवार हिचा वेस्टर्न रोल लाजवाब, यांच्या सोबत कॉन्सुलरच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री, पूजा पवारच्या आजोबांच्या भूमिकेत विजय पाटकर एकदम मस्त, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारसुद्धा उत्तम.

‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ आणि ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘36 गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. प्रसाद भेंडे यांचे अफलातून छायाचित्रण पहावयास मिळते.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns