सोपा करून सांगितलेला ‘विषय हार्ड’
सचिन चिटणीस, चित्रपटाला मिळत आहे ⭐⭐⭐
महाराष्ट्रातून जरी करोना जाऊन चार वर्षे उलटून गेली असली तरीही त्यावर चित्रपट निघायचे बंद होत नाही आहे कारण करोना हा विषय हार्ड आहे. मात्र दिग्दर्शक सुमित पाटील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात तसेच हलक्या फुलक्या पद्धतीने हा विषय मांडल्याने तो समजावयास फारच सोपा झाला आहे.
सुमित ( संड्या ) पुण्याहून उच्चशिक्षित होऊन आपल्या गावात येतो मात्र त्याच वेळेस कोरोना रोग पसरू लागल्याने गावातील सर्व जणांना बाहेर पडणे बंद करण्यात येते त्यात सुमितला कोरोनाची लागण झाली आहे असे समजून त्यास विलगीकरणात ठेवण्यात येते. सुमित ची प्रेयसी पर्ण पेठे ( डॉली ) च्या लग्नाचा बघण्यासाठी म्हणून पूर्ण पेठेला बघायला मुलं येत असतात त्यामुळे पर्ण पेठे सुमितला सतत फोन करून काहीतरी लवकर कर नाहीतर माझे आई-वडील माझं लग्न लावून मोकळे होतील असा तगादा लावते.
यामुळे सुमित विलगीकरण कक्षातून पळून जातो डॉलीला बघायला विपीन बोराटे हा पोलीस असलेला डॉलीला बघायला येतो पण डॉलीला पसंत करतो. तसेच गावातील अजून एकाचे डॉलीवर प्रेम असते. बोराटे पोलीस डॉली बरोबर आजच्या आज लग्न उरकून टाका म्हणून डॉलीच्या वडिलांच्या मागे लागतो हे संभाषण ऐकून डोळे घरातून पळून जाते.
बोराटे पोलीस हा भ्रष्ट अधिकारी असतो व त्यांनी अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा गावाच्या बाहेर येईल एका पडक्या घरात लपवलेला असतो. सुमितला हे कळते व सुमित ही पैशाची बॅग घेऊन पळून जातो.
या धावपळीत सुमित व पर्ण पेठे भेटतात का पोलीस पाटलाला अनैतिक मार्गाने मिळवलेल्या पैशाबद्दल शिक्षा होते का तसेच डॉलीचा तिसरा प्रियकर त्याचे काय होते हे मोठ्या पडद्यावर पाहणे खूप मजेदार आहे.
अभिषेक शेटे व जय पारेख चा कॅमेरा उत्तम फिरला आहे