भूत आली राहायला….

भूत आली राहायला…..

पूर्वी वडीलधारी मंडळी भुता खेताच्या गोष्टी सांगून लहान मुलांना घाबरवत जेणेकरून ती लहान मुलं वेळी अवेळी कुठेही जाणार नाहीत घरातच बसतील हा त्या मागे हेतू होता.शहरात हे प्रमाण अत्यल्प असले तरी गावागावात अजूनही काही प्रथा चालू आहेत आणि गावातील मंडळी त्या प्रथांचे पालन करतात.

कोकणातील अशाच एका गावात वर्षातून एकदा तीन दिवस संपूर्ण गाव वेशी बाहेर जाऊन राहत. दरवर्षीची ही प्रथाच पडली असून. यामागे गावच्या प्रमुखांच्या पूर्वजांनी केलेले अत्याचार त्यास कारणीभूत आहेत.

या गावावर तीन दिवस वेशीच्या बाहेर जाण्याची वेळ येते नेमका याच दिवशी शहरातून चतुर आणि किश्या या मित्रांसोबत पंक्या गावी येतो.

पण पंक्या, चतुर आणि किश्या संध्याकाळच्या वेळेस दिल्याच्या होडीने पुन्हा गावात जातात. त्यांच्या होडीत लपून सरपंचांची मुलगी निधीही जाते. दोर सुटल्याने काठावरची होडी वाहून जाते. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे.

पटकथा चांगली आहे; पण रहस्याचा उलगडा करण्यात गोंधळ झाला आहे.कोकणातील निसर्गसौंदर्य सुरेखरीत्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. रहस्य आणखी गडद करण्यात पार्श्वसंगीताचा मोठा वाटा आहे. नयनरम्य लोकेशन्स आहेत. व्हीएफएक्सही चांगले आहेत. पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो; पण उत्तरार्ध गमतीशीर आणि उत्कंठावर्धक आहे.

कोकणात बोलली जाणारी बोलीभाषा मात्र चित्रपटात आढळत नाही.भूत पळवण्याचा मंत्र हास्यास्पद वाटतो. प्रीतम एस. के. पाटीलने या चित्रपटात तोच धागा पकडून भुतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या गावाची कथा सादर केली आहे.

महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये गावपळणीची प्रथा आजही पाळली जाते. त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहावा.

अभिनयावर प्रभुत्व असणारा मकरंद देशपांडे मात्र यात फारशी चमक दाखवू शकला नाही मांत्रिक असूनही मध्ये मध्ये तो इंग्लिश वाक्य झाडतो.त्यामानाने गौरव मोरेने आपल्या अभिनयाने धमाल आणली आहे.सक्षम कुलकर्णीनेही किश्या चांगलाच रंगवला आहे. एक वेगळाच संदीप पाठक या चित्रपटात पाहायला मिळतो.भाग्यम जैनने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अनुष्का पिंपुटकरने महत्त्वपूर्ण असलेली व्यक्तिरेखा सहजपणे साकारली आहे. सुरेश विश्वकर्माच्या रूपातील सरपंच कोकणातील वाटत नाही. चिन्मय उदगीरकरच्या रूपात मनाचा थरकाप उडवणारा खलनायक आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns