सचिन चिटणीस….या चित्रपटाला मिळत आहेत २.५ स्टार
समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार, कोणत्याही कामात पैसे ख्याण्याची लागलेली सवय त्यासाठी वाटेल तो नियम सांगून समोरच्या व्यक्तीकडून पैसे उकळणं हे आताशा सर्वच ठिकाणी होऊ लागले आहे यावरच थोड्याफार गमतीशीरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटात केला गेला आहे.
पुण्यात राहणारे गोविंद कुलकर्णी ( आप्पा – भरत जाधव ) मध्यमवर्गीय गृहस्थ, त्यांचे वडील रमाकांत कुलकर्णी ( दिलीप प्रभावळकर ) यांचे आता खूप वय झालंय, गणेशोत्सव जवळ आलाय, यावर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करू या विचाराने त्यांच्या मुलाची म्हणजेच गोविंदची ऐपत नसतांना ते भरमसाठ खर्च करतात, तेही त्यांच्या जुन्या मुदत ठेवींच्या भरवशावर. पण बँक FD चे पैसे द्यावयास टाळाटाळ करते, आता गोविंदला प्रश्न पडतो तो लोकांची देणी फेडायचे कशी याचा. देणेकरी घरी फेऱ्या मारायला लागतात, त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहतो. त्याला त्रासून गोविंद गणपतीबाप्पाला साकडे घालतो आणि चमत्कार घडतो स्वतः गणपती बाप्पा गोविंदच्या मदतीला धावून येतात व त्यांच्यावरचे विघ्न दूर करतात आणि स्वतःचे विसर्जनही सुरळीत पार पाडतात.
हिंदीत येऊन गेलेला ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाशी साधर्म साधण्याच्या प्रयत्नात चित्रपट खूप लांबला आहे. फसलेल्या पटकथेमुळे चित्रपट दिग्दर्शकाच्या हातून ही निसटला आहे.
सुबोध भावे व भरत जाधव यांनी मात्र चित्रपटात थोडीफार जान आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सुबोध व भरतच्या चाहत्यांना चित्रपट नक्कीच आवडेल.
प्रस्तुतकर्ते – गरीमा प्रोडक्शन्स्
निर्माते – गरीमा धीर, जलज धीर
लेखन – अश्वनी धीर व अरविंद जगताप
छायाचित्रण – सूर्या मिश्रा
संगीत – सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट
पार्श्वसंगीत – मंगेश धाकडे
कलादिग्दर्शक – जयंत देशमुख
लाईन प्रोड्यूसर – अजित सिंग
वितरक – ‘पॅनोरमा स्टुडिओज् इंटरनॅशनल’
कलाकार
दिलीप प्रभावळकर – रमाकांत कुलकर्णी
भरत जाधव – गोविंद कुलकर्णी
सुबोध भावे – विनायक
संपदा कुलकर्णी – मंदा कुलकर्णी
शिवानी रांगोळे – दिपाली कुलकर्णी
वृषभ नायक – संचित कुलकर्णी
संजय चौधरी – राजकुमार
उमेश जगताप – झोटिंग साहेब