भावनिक जीवन प्रवासाची झलक उलगडून दाखवणारा ‘देवमाणूस’

भावनिक जीवन प्रवासाची झलक उलगडून दाखवणारा ‘देवमाणूस’

सचिन चिटणीस

गूढ, उत्कंठावर्धक आणि एका वयस्क जोडप्याच्या भावनिक जीवनप्रवासाची झलक दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर यांच्या ‘देवमाणूस’ या चित्रपटातून उलगडली जाते, आणि हळूहळू प्रेक्षक त्या चित्रपटाला आपला जीवन प्रवास समजून समरसून जातो.

या चित्रपटामध्ये भावना, रहस्य आणि नाट्य यांचा सुरेख मेळ साधला आहे. तसेच कथा आणि पात्रांमधील गुंतागुंत, कलाकारांची सशक्त अभिनय शैली आणि दृश्यांमधून निर्माण होणारा भावनांचा ठसठशीत प्रवाह यात असून हा चित्रपट एक अतिशय वेगळाच अनुभव देऊन जातो.

‘वध’ या हिंदी चित्रपटाचा हा चित्रपट रिमेक असला तरीही देवमाणूस बघतांना प्रेक्षक गुंतून जातो. त्यातही ज्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीनिमित्त परदेशात गेला आहे त्यांना तर हा चित्रपट बघताना काळजी वाटू लागते.

चित्रपटाची कथा सरळसोट असून आपला एकुलता एक मुलाला घर गहाण ठेवून परदेशात नोकरीसाठी पाठवणारे आई-वडील त्या मुलाचे तिथे बस्तान बसल्यावरती आई-वडिलांना न विचारणे, तसेच त्यांना न सांगताच लग्न करणे व ज्या गावातील घरावरती कर्ज घेतले आहे त्याचे लोन फेडावयास त्या मुलाने टाळाटाळ करणे व त्यात आई-वडील भरडले जाणे व त्यातूनच एक विचित्र घटना घडणे हे सर्व चित्रपटाला कलाटणी देते.

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ या बहुचर्चित चित्रपटात पहिल्यांदाच शानदार  ‘आलेच मी’ या लावणीवर थिरकताना दिसणार आहे. मराठमोळ्या लावणीवर सईच्या नखरेल अदा म्हणजे सईच्या फॅन साठी ही एक मेजवानीच असेल.

आता सर्वात महत्त्वाचे रफ अँड टफ महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात केशव भाऊ या म्हाताऱ्याची भूमिका केली आहे. तो कुठेही अभिनय न वाटता सहजतेने महेशने म्हाताऱ्यांचे कांगोरे इतक्या बारकाईने पेश केले आहेत की क्या बात.

महेशला रेणुका शहाणे यांनी अप्रतिम साथ दिली आहे.

सुबोध भावे यांनी इन्स्पेक्टर रवी देशमुख सहजतेने रंगवला आहे.

सिद्धार्थ बोडके यांनी दिलीप शेठ हे पात्र रंगवले असून व्हिजन असला तरीही सिद्धार्थ बोडके त्याच्या अभिनयाने आपल्या लक्षात राहतो.

अभिजीत खांडकेकर यांनी जेधे या राजकारणी पात्र रंगवले आहे.

रोहन रोहन यांचे संगीत छान जमून आले आहे.

एकूण चित्रपट मनात घर करून राहतो. तसेच पुत्र प्रेमापोटी आपल्या पुढील आयुष्याची तरतूद न करणाऱ्या आई-वडिलांना सुद्धा जाता जाता इशारा देऊन जातो.

IPRoyal Pawns