होशवालों को खबर क्या
बेखुदी……क्या चीज़ है
इश्क कीजिये…..फिर समझिये
ज़िन्दगी……क्या चीज़ है
उनसे नज़रें क्या मिलीं
रौशन फिज़ाएँ हो गयीं
आज जाना प्यार की
जादूगरी……क्या चीज़ है
सचिन चिटणीस या चित्रपटाला मिळत आहेत 3 स्टार
प्रेमात सगळ्यांचे हे असेच होत असते, कोणाला त्याचे प्रेम मिळण्यासाठी वर्षोनवर्षं थांबावे लागते तर कोणाला ४ दिवसात प्रेम मिळते असेच आपला हिरो जगदीश तात्या कळण ( अमेय वाघ ) ला त्याचे वडील तात्या ( उपेंद्र लिमये ) योगा टूर ला पाठवतात. मात्र तिथे गेल्यावर जग्गु ला कळते की इतर सर्वजण आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. तेव्हा तो त्या ग्रुप मधील समीर धर्माधिकारी यांस इथून बाहेर पडण्याची आयडिया विचारतो. समीर त्याला ५ दिवस देतो या ५ दिवसात तू तुझें प्रेम मिळवू शकत असशील तर तू जाऊ शकतो. जग्गु लगेच तयार होतो व निघतो.
असाच रस्त्यावर सर्व मुलींना पुष्पगुच्छ देत माझ्या बरोबर मैत्री करा हे सांगत फिरत असतांना जुलियेट ( वैदेही परशुरामी ) ला जग्गु दिसतो व हा असे वेड्यासारखे का करत आहे हा विचार करत असतांना जग्गु सुद्धा तिला बघतो व तिच्या प्रेमात पडतो.
ज्युलि ही अमेरिकेतून आलेली असते व तिला आपल्या आईने भारतात असतांना जिथे जिथे रोमियो जुलिऐट चे प्रयोग केले होते तिथे तिथे भेट द्यायची असते, म्हणून ती त्याच्याबरोबर मैत्री करते.
मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात होते हे ज्युलिला कळत नाही, ती जगगुला होकार देते मात्र ज्या दिवशी मुंबईला जायचे असते तेव्हा ती जग्गु साठी एक चिठ्ठी ठेवून जाते आणि ती चिठ्ठी वाचून जग्गु उदास होतो.
असे काय असते त्या चिठ्ठीत, जग्गुला त्याचे प्रेम मिळते का…..नाही इथे दिग्दर्शकाने मोठा ट्विस्ट टाकला आहे. बघा आणि ‘जग्गू आणि जुलिएट’ २ ची वाट बघा.
अमेय वाघने जग्गुच्या भूमिकेत सप्तरंग भरले आहेत.
वैदेही परशुरामी नुसतीच सुंदर दिसत नाही तर तिने काम पण छान केले आहे.
…..आणि उपेंद्र लिमये ने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याचा हा वेगळा अभिनय धमाल.
वाड्या नेहमी प्रमाणे मस्त.
प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले, केयुरी शाह, सुनिल अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार आणि हृषीकेश जोशी सर्वांचे अभिनय उत्तम.
चित्रपट अजून १० ते १२ मिनिटे कमी झाला अस्तातर, अजून धमाल आली असती.
निर्माते – पुनित बालन स्टुडिओज्
दिग्दर्शन व छायांकन – महेश लिमये
कथा, पटकथा – महेश लिमये, अंबर हडप, गणेश पंडित
संवाद – अंबर हडप, गणेश पंडित
संगीत – अजय-अतुल
गीते – गुरू ठाकूर, अजय-अतुल
संकलन – जयंत जठार
मार्केटिंग –विनोद सातव
साऊंड डिझाईन – अनमोल भावे
कला दिग्दर्शन – एकनाथ कदम
वेशभूषा – मानसी अत्तर्डे
पार्श्वसंगीत – विजय गावंडे
कार्यकारी निर्माता – जितेंद्र कुलकर्णी
लाईन प्रॉड्युसर – ओंकार हर्डिकर
इपी – अनुप गोरे (पुनित बालन स्टुडिओज्)