भावपूर्ण सुरांनी भारलेला, सुमधुर सुरांचा राम ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’
सचिन चिटणीस….⭐⭐⭐1/2
ज्यांनी माणसा माणसात राम स्थापित केला, ज्यांच्या लग्नात ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी साहेबांनी मंगलाष्टक म्हटली, ज्यांच्या साठी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे यांनी गाणी गायली अशा स्वरगंधर्व राम फडके अर्थात बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचा बायोपिक १ मे पासून महाराष्ट्रात लागला आहे. बाबूजींवर प्रेम करणाऱ्यांनी तर हा चित्रपट बघावाच मात्र जीवनात काही बनायचे असल्यास कितीही कष्ट घेण्याची तयारी असलेल्या माणसांनी तर हा चित्रपट जरूर बघावा.
ह्या चित्रपटात बाबूजींचा जीवनाबरोबरचा प्रचंड संघर्ष दाखवलेला आहे. जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागतो मात्र तोही मिळत नसून देखील बाबूजींनी एवढी मोठी झेप घेतली ती फक्त आणि फक्त आपल्या संगीताच्या प्रेमा खातर.
चित्रपटाची सुरुवात होतो ती दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमाला बाबूजी मुलाखत देत असताना…. बाबूजी ७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना कोल्हापूर येथील गांधर्व संगीत विद्यालयात वामनराव पाध्ये बुवा यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी पाठवले. हिराबाई बडोदकर यांची बालगंधर्वांची गाणी हॉटेल मध्ये लागली असताना बाहेर उभे राहून बाबूजी ऐकत असायचे.
बाबूजी हे लहानपणापासूनच सावरकरांचे भक्त होते
सावरकरांच्या भेटीत बाबूजींना सावरकरांनी दिलेले मोपल्यांचे बंड हे पुस्तक बाबूजींचे प्रेरणास्थान होते.
न ना देशपांडे यांनी बाबूजींना सुमधुर सुरांचा राम हे नाव दिले.
बाबूजी त्याकाळी संघाच्या कार्यालयात राहत असेल बाबूजींना त्यांच्या दोन मामांनी मिळून दोनशे रुपये संगीत विद्यालय काढण्यासाठी दिले होते मात्र बाबूजींना फसवून तेथील माणसांनी ते पैसे गडप केले व संघाच्या कार्यालयातून हाकून दिले बाबूजींसोबत त्यांचा मित्र नाना गाडगीळ देखील बाहेर पडला. खिशात पैसा नाही राहिला, जागा नाही, पोटाला अन्न नाही, या कात्रीत सापडलेल्या बाबूजींच्या मनात त्यावेळेस यासारख्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा येऊन आत्महत्या करायला जातात मात्र तेव्हा त्यांचा मित्र नाना वाचवतो.
बाबूजींचा संगीतकार होणे हा ध्यास असतो म्हणून त्यांच्या मित्रांकडून नाशिकला जाण्याचा सल्ला मिळतो. मात्र इथेही बाबूजींना हवे तसे पैसे मिळत नाहीत.
तेव्हा बाबूजी कलकत्त्याला कलकत्ता महाराष्ट्र मंडळामध्ये जातात व इथल्या मी एका म्युझिक कंपनीत काम मिळवतात इथे त्यांना बाबूजी हे नाव मिळते.
कोल्हापुरात ग दी मांची भेट होते. पेटकर बाबूजींना साहेब मामा फत्तेलाल यांच्या कडे घेवून जातात. इथून पुढे प्रभात कंपनीचे नवीन संगीत दिग्दर्शक म्हणून सुधीर फडके यांना काम मिळते.
नगर हवेली पोर्तुगीजांच्या हातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढा उभारणीच्या कामात सुधीर फडके सक्रिय लढा देतात.
श्रीधरला घटसर्प होऊन तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि त्याच दिवशी रेडिओ वरती ‘गीत रामायण’ चे पहिले गीत रेकॉर्डिंग असते, बाबूजी स्टुडिओ मधून तडप हॉस्पिटलमध्ये जाऊन श्रीधरच्या चौकशी करून तो बरा आहे हे कळल्यावर ते पुन्हा सकाळी दोन वाजता हॉस्पिटलमध्ये येतात व ‘स्ववे श्रीराम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती” चा जन्म होतो.
शिवाजी नाट्य मंदिर पुणे येथील बाबूजींच्या गीत रामायण या कार्यक्रमासाठी स्वतः सावरकर येतात तेव्हा ते बाबूजींना म्हणतात आपण माझे आवडीचे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणे गाल का?’
बाबूजी चे गाणे गातात तेव्हा सावरकरांच्या डोळ्यात पाणी येते.
श्रीधर फडके संगीतकार म्हणून उदयास आल्यावर बाबूजी व आशाबाईं त्यांच्यासाठी गीत गातात ते म्हणजे ” फिटे अंधाराचे जाळे “
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट काढणे ही माझी शेवटची इच्छा आहे असे बाबूजी दरवेळेस बोलून दाखवत असत. त्यासाठी लागणाऱ्या पैसा बाबूजींनी स्वतः घरोघरी जाऊन जमवला होता.
गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ मध्ये काम केलेले कलाकार……
सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका सुनील बर्वे ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे
ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर
आदिश वैद्य (तरूण सुधीर फडके), अपूर्वा मोडक (आशा भोसले), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), मिलिंद फाटक ( राजा परांजपे), धीरज जोशी (स्वातंत्र्यवीर सावरकर), विहान शेडगे (छोटा राम), विभावरी देशपांडे (सरस्वतीबाई, सुधीर फडकेंची आई), नितीन दंडुके (पाध्ये बुवा), परितोष प्रधान (डॅा. अशोक रानडे), साहेबमामा फतेहलाल (अविनाश नारकर), डॅा हेडगेवार (शरद पोंक्षे), न. ना. देशपांडे ( उदय सबनीस), मोहम्मद रफी (निखिल राऊत), निखिल राजे शिर्के ( श्रीधर फडके) या नामवंत कलाकारांना या व्यक्तिरेखांमध्ये पाहाणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
सौरभ गाडगीळ प्रस्तुत, रिडिफाईन प्रॅाडक्शन्स निर्मित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.