वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

*”वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी*

*अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ. नीलम गोऱ्हे*

मुंबई, : राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्राची टक्केवारी अत्यंत कमी आहे. धाराशिव, बीड, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये तर वनक्षेत्र १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. राज्याच्या एकूण भूपृष्ठाच्या सरासरी २० टक्के क्षेत्रावरच वनक्षेत्र आहे, जे आदर्श ३३ टक्क्याच्या निकषाच्या तुलनेत कमी आहे.

या पार्श्वभूमीवर, डॉ. गोऱ्हे यांनी वनमंत्री नाईक यांना विशेष मोहिम आखून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. तसेच, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

IPRoyal Pawns