सचिन चिटणीस ( या चित्रपटाला मिळत आहेत ४ स्टार )
कोणत्याही बँकेत साधे खाते नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी असे ज्या व्यक्तीचे वर्णन करण्यात येते अश्या असामान्य व्यक्तीला म्हणजेच आनंद दिघे साहेबांना ठाण्यात न ओळखणारी व्यक्ती सापडणे अशक्यच आहे. दिघे साहेबांची काम करण्याची पद्धत, त्यांचा दरारा, अन्याया विरुद्ध असलेली प्रचंड चीड या व इतर कितीतरी साहेबांच्या पद्धतीवर ठाण्यातील जनता त्यांना आजही देव मानते.
याच करता लोक त्यांना ‘धर्मवीर’ या नावाने ओळखू लागले व दिघे साहेबांच्या जागी धर्मवीर आनंद दिघे साहेब झाले. हाच धागा पकडत दिघे साहेबांच्या प्रेमा खातर निर्माता मंगेश देसाई यांनी साहेबांची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ हा चित्रपट प्रवीण तरडे या गुणी दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली व सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम अभिनेता प्रसाद ओकच्या साथीने व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने करावयाचे ठरवले आणि मंगेशच्या या पहिल्याच प्रयत्नाला तुफान यश लाभले आणि लोकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला.
दिघे साहेबांचे ५० वर्षाचे आयुष्य म्हणजे एक धगधगता अग्नीकुंड होता पण साहेब जरी पन्नास वर्षे जगले असले तरी साहेबांनी दिवस रात्र एक करत आपल्या शिवसैनिका साठी काम शंभर वर्षाचे केले होते.
“जंगलात राहून वाघाशी व महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही करायचे,”
“ज्याच्या दारावर भगवा त्याच्या घरात हिंदुत्व”
“साहेबांच्या एका चिठ्ठी मुळे ज्यांची आयुष्य बदलली न त्यांना विचारा त्यांची देवाची व्याख्या काय आहे.”
“माणूस जपण्याइतका मोठा धर्म नाही”
“गरजवंताला धर्म जात काही नसते, डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही तर डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान आपला दुश्मन आहे.”
असे एका पेक्षा एक डायलॉग ने समृद्ध असा हा चित्रपट सुरू झाल्या पासून संपे पर्यंत टाळ्या शिट्ट्या आणि दिघे साहेबांच्या नावाचा जयजयकार करत कधी सुरू होतो आणि कधी संपतो तेच कळतं नाही इतके आपण त्यात गुंतून गेलेलो असतो मात्र प्रविण तरडेंच्या “थांबा इथे चित्रपट संपत नाही आहे, अजून बरंच काही बाकी आहे”
चित्रपट: धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे
निर्माते: मंगेश देसाई, झी स्टुडीओज्
कलाकार: प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, शुभांगी लाटकर
कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन: प्रविण विठ्ठल तरडे
रंगभूषाकार : विद्याधर भट्टे, श्रेयस म्हात्रे
छायांकन : केदार गायकवाड