समाजव्यवस्थेवर मारलेली सणसणीत चपराक
सचिन चिटणीस, या चित्रपटास मिळत आहेत तीन स्टार
लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात जुळतात मात्र पृथ्वीतलावावरती या जुळलेल्या गाठी घट्ट करण्याकरता मुलीच्या बापाला जे कष्ट पडतात त्याची परिसीमाच वेगळी आहे.
दौलतराव ( तारानाथ खिरटकर ) आपली पत्नी लीलाबाई ( संगीता सोनेकर ) आपल्या दोन मुलां सह सविता ( नंदिनी चिकटे ) व मंगेश ( सुयोग धवस ) डोंगरगावात राहत असतात.
सविता BA शेवटच्या वर्षाला असते ती व तिच्या दोन मैत्रिणी रोज कॉलेजमध्ये जात असतात. त्यांच्यातील रंजू ( गौरी बदकी ) हिचे लग्न ठरते लग्न होऊन ती सासरी जाते. तर सुमनचे ( मानसी पवार ) एका मुलावर प्रेम असते.
सविताचे वडील सवितालाही चार-पाच ठिकाणी दाखवतात मात्र सर्व ठिकाणाहून नकारघंटा येते. त्यामुळे त्यांना खूप टेन्शन येते.
सविता ज्या कॉलेजमध्ये शिकत असते त्या कॉलेजमधील प्राध्यापकाला सविता आवडत असते व सवितालाही तो प्राध्यापक आवडत असतो. एक दिवस नातेवाईकांसह सविताला बघायला तिच्या घरी येतो प्राथमिक बोलणी होतात प्राध्यापकाचे वडील सविताला पसंत करतात मात्र इतर नातेवाईकांशी बोलून तुम्हाला कळवतो हे सांगून निघून जातात. नंतर ते काळे गुरुजी मार्फत पुन्हा म्हणून पाच लाख रुपये सविताच्या वडिलांकडे मागतात या धक्याने सविताचे वडील पूर्णपणे खजूर जातात व आत्महत्येसारखे पाऊल उचलतात मात्र त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारात साठी दाखल केल्यामुळे ते वाचतात.
सविताच्या लग्नासाठी त्यांच्याकडे असलेलं कापसाच्या शेती इथे विकायला तयार होतात मात्र तोपर्यंत मुदत द्यावी अशी प्राध्यापकांच्या वडिलांकडे ते विनंती करतात आणि वडील ती विनंती धुडकावून लावतात.
मग पुन्हा सुरू होतो सविताला बघण्याचा कार्यक्रम मुलाकडची मंडळी येणार तिचं नाव विचारणार, तिची उंची विचारणार, कुठपर्यंत शिक्षण झाले हे विचारणार, जेवण बनवता येतं काय विचारणार, इतर छंद विचारणार मात्र आता सविता मनाने खंबीर बनलेली असते आणि आलेल्या पाहुण्यांना ती चांगलाच धडा शिकवते. व इथे चित्रपटाचा शेवट होतो ती असा काय धडा शिकवते हे मोठ्या पडद्यावर पाहणेच जास्त परिणामकारक होईल.
गोष्ट तशी साधी सरळ असली तरी समाज व्यवस्थेला मारलेली ही सणसणीत चपराकच आहे.
कलाकार नवीनच असले तरी तारानाथ खिरटकर यांनी सविताच्या वडिलांचा रोल अतिशय उत्तम रित्या सादर केल्या आहे. त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील अभिनयाने त्यांची व्यथा मांडली आहे. सविताचा रोल करणारी नंदिनी चिकटे हिने त्यांना उत्तम साथ दिली आहे.
इतर सर्व कलाकारांच्या अभिनय उत्तम असून चित्रपटात जास्ती बडबड न घालता कलाकारांना शांत ठेवून परिणाम दिग्दर्शकांनी खूप चांगला साधला आहे.
*चित्रपट – स्थळ*
सेन्सॉर – U/A (१२ वर्षावरील)
वेळ – १०७ मिनिटे
प्रस्तुती – सचिन पिळगांवकर
निर्मिती संस्था – धुन प्रॉडक्शन
निर्माते – शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा, जयंत दिगंबर सोमलकर
सहनिर्माते – ज्ञानेश झोटिंग
कथा/ पटकथा/ संवाद/ गीत/ दिग्दर्शन – जयंत दिगंबर सोमलकर
छायांकन – मनोज कर्माकर
संकलन – अभिजित देशपांडे
गीतकार – जयंत दिगंबर सोमलकर
संगीत – माधव अगरवाल
सहसंगीतकार – तमारा काजीहा
गायिका – मीराबाई येटे
*कलाकार*
नंदिनी चिकटे – सविता
तारानाथ खिरटकर – दौलतराव (सविताचे वडील)
संगीता सोनेकर – लीला बाई
सुयोग धवस – मंगेश
संदीप सोमलकर – काळे गुरुजी
संदीप पारखी – खापणे
स्वाती उलमाले – गौरी
गौरी बदकी- रंजू
मानसी पवार – सुमन