सचिन चिटणीस….या चित्रपटाला मिळत आहेत 4*
“इस जनम मे तो नही अगले जनम में मुझे एक हंबिराव जरूर देना, हिंदुस्तान तो क्या पुरे दुनिया पे राज करुंगा” औरंगजेब खुदा कडे मागणे मागतो, या एका वाक्यातच ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट कसला अफाट असेल याची आपल्याला कल्पना येते आणि या कल्पनेला कथा, पटकथा, संवाद, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे बिलकुल पूर्ण चित्रपटभर तडा जाऊन देत नाहीत आणि हेच या चित्रपटांचे बलस्थान ठरते.
प्रवीण तरडे यांचे जीव तोडून काम, स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपट कुठेही अतिशयोक्ती न करता अलगदपणे प्रवीण तरडे नी वाहून नेला ते प्रशंसनीय आहे. त्या बद्दल प्रवीण तरडे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, मोहन जोशींचा औरंगजेब सुंदर कुठेही आक्रस्ताळेपणा न करता अतिशय शांत चित्ताने संयमी अभिनयाच्या जोरावर मोहन जोशी यांनी साकारलेला औरंगजेब आपल्या मनात घर करून जातो. या सर्वांना मोलाची साथ दिली आहे ती गुणी अभिनेता गश्मीर महाजन याने चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज या दोन व्यक्तिरेखा गश्मीर ने साकारल्या असून या दोन्ही व्यक्तिरेखा त्यातील बारकावे उत्कृष्टरित्या मांडले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारताना संयमी, धीरोदात्त पण तरीही कणखर हे गश्मीर मे आपल्या अभिनयाच्या जोरावर जबरदस्त मांडले आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारताना एक करारी, आक्रमक, निधड्या छातीचे व मुरब्बी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीरने अफाट सुंदर साकारली आहे.
सरसेनापती हंबीरराव यांचे इतिहासात असलेले योगदान व आपणास माहिती असलेले हंबीरराव त्याच्या कितीतरी पुढे आपणास सदरहू चित्रपट बघितल्यावर हंबीररावांचे शौर्य काय असेल याची कल्पना येते एक माणूस इतका पराक्रमी असू शकतो यावर आपण अवाक होऊन जातो.
आदिलशहा बरोबरचा युद्धाचा प्रसंग तसेच इतर युद्धाचे प्रसंग सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी इतके सुंदर चित्रित केलेले आहेत की आपल्या तोंडून वाह शब्दच बाहेर पडतो.
“संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो नंतर गुन्हेगार साफ करतो” छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडी असलेली ही वाक्य प्रेक्षकगृहात टाळ्यांचा कडकडाट करतात.
“आज आपला भगवा मातीत नाही, गनिमांच्या छातीत रोवायचा”
“मुगल सल्तनत के पास सब कुछ है, मगर ना शिवा हात आया ना संभा क्युकी यहा हर एक घर मे हंबीरराव हैं” अश्या स्फुर्तीदायक वाक्यांनी चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो.
श्रुती मराठे हिने महाराणी सोयराबाई यांची भूमिका अतिशय तन्मयतेने रंगवली आहे थोडीशी ग्रे शेड असलेली ही भूमिका रंगवताना ती कुठेही भडक होणार नाही याची दक्षता जस दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घेतली, तसेच श्रुती मराठे ने ही घेतलेली आपल्याला दिसते. स्नेहल तरडे यांनी साकारलेली लक्ष्मीबाई भाव खाऊन जाते, त्यांच्या डोळ्यातील अभिनय उत्कृष्ठ.
आता चित्रपटाबद्दल थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीन महिने अगोदर हंसाजी मोहिते यांचे सरनोबत हंबीरराव मोहिते असे नामकरण करत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सरसेनापती हे पद देतात. तेही आपली पत्नी सोयराबाई यांचा भाऊ म्हणून नाही तर त्यांच्या पराक्रमामुळे हे पद त्यांना दिले जाते हंबीरराव हे जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत एक निष्ठेने काम करत असतात तसेच ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर सुद्धा एक निष्ठेने काम करत असतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर जेव्हा गादीवर कोण बसणार याच्या फैसला महाराणी सोयराबाई आपला पुत्र राजाराम महाराज यांनी गादीवर बसावे ते असे फर्मान काढतात तेव्हा हंबीरराव आपल्या बहिणीच्या या फर्मानाला विरोध करतात, कारण त्यांचे असे म्हणणे असते की छत्रपती संभाजी महाराज मोठे असून गादीवर बसण्याचा त्यांचाच हक्क आहे व राजाराम महाराज हे वयाने अजून लहान असल्याने त्यांना गादीवर बसवू नये यावरून सोयराबाई व हंबीरराव दोघेही सख्खे भाऊ-बहीण आहेत त्यांच्यात वादही घडताना दाखवण्यात आला आहे.
मात्र हंबीरराव एकनिष्ठेने संभाजी महाराजांना साथ देतात व कित्येक लढाया आपल्या बाजूच्या जोरावर तसेच हुशारीवर जिंकूनही देतात.
आपल्या सैनिकांना वाचवण्यासाठी छातीवर तोफेचा गोळा घेऊन हंबीरराव अमर होतात हा प्रसंग मनाला चटका लावून जातो व त्यानंतर औरंगजेबाने अल्लाकडे केलेली मागणी हंबीररावांचे कर्तुत्व किती महान असेल हे जाणवते.
चित्रपट : सरसेनापती हंबीरराव
प्रविण विठ्ठल तरडे – कथा पटकथा संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता
उर्वीता प्रॉडक्शन्स – प्रोडक्शन हाऊस
संदीप मोहिते पाटील – प्रस्तुतकर्ता
शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा – निर्माते
महेश लिमये – छायाचित्र
सरसेनापती हंबीरराव पात्र परिचय
प्रविण विठ्ठल तरडे – सरसेनापती हंबीरराव
गश्मीर महाजनी – छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज
उपेंद्र लिमये – बहिर्जी नाईक
मोहन जोशी – औरंगजेब
राकेश बापट – सर्जा खान
सुनील पालवाल – बहादूरखान
श्रुती मराठे – सोयराबाई
स्नेहल तरडे – लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते
रेवती लिमये – येसूबाई
शुभांगी दामले – राजमाता जिजाऊ