देशात बदल घडवणारे विचार सादर करणारा ‘अन्य’

सचिन चिटणीस……….

 

देशात बदल घडवणारे विचार सादर करणारा ‘अन्य’

प्रत्येक माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा असतोच… तसाच प्रत्येक चांगल्या माणसातसुद्धा वाईट माणूस असतो… आणि प्रत्येक वाईट माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा चांगला माणूससुद्धा असतो… हेरगिरी, सत्य परिस्थिती, सेक्स ट्रॅफिकींग, बालमजूरी, अनाथांची व्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आजघडीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना ‘अन्य’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ स्पर्श करतात.

देशात बदल घडवणारे विचार सादर करणारा अन्य चित्रपट आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकतो. सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट मानव तस्करीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेऊन समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा प्रयत्न या मध्ये करण्यात आला आहे.

सिम्मी यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं असून, संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं आहे. अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. यांच्या जोडीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही नावलौकीक मिळवलेली अभिनेत्री रायमा सेन, हिंदी सिनेसृष्टीतील यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव हे कलाकारही ‘अन्य’मध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हिंदी सिनेमासाठी डॅा. सागर आणि सजीव सारथी यांनी, तर मराठीसाठी प्रशांत जामदार यांनी गीतं लिहीली आहेत.

संगीतकार विपीन पटवा यांच्यासह राम नाथ, रिषी एस. आणि कृष्णा राज यांनी या गीतांना संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत रोहित कुलकर्णी यांनी दिलं असून, सज्जन कालाथील यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. निलम शेटये यांनी कॅास्च्युम डिझाईन, साभा मयूरी यांनी कोरिओग्राफी आणि थनुज यानी संकलन केलं आहे. प्रोडक्शन डिझाईनर म्हणून शेखर उज्जयीनवाल यांनी, तर असोसिएट दिग्दर्शक म्हणून नंदू आचरेकर, रॅाबिन आणि राजू यांनी काम पाहिलं आहे.

निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं ‘अन्य’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटानं स्वीडनमधील अॅलव्हिसबीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, लंडनमधील फॅलकॅान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (मे एडिशन २०२१) मध्ये बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी केलं आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns