‘फास’…. वास्तवतेची दाहकता

निसर्गाचं असंतुलन, सरकारी धोरण, शेतक-यांच्या आत्महत्या यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम, अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘फास’ या चित्रपटात पहायला मिळतो. समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करणारा व अतिशय महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला असल्याने सदरहू चित्रपट इतरां पेक्षा वेगळा ठरतो.

आणि म्हणूनच “कान” चित्रपट महोत्सवामध्ये
स्क्रिनिंग झालेल्या ‘फास’चं जपान आणि पॅरिससारख्या देशांसह राजस्थान व नोएडासारख्या चित्रपट महोत्सवांमध्येही कौतुक करण्यात आलं होत.

अवकाळी पाऊस, दलाल आदी अनेक गोष्टीने त्रस्त झालेला शेतकरी आपले जीवन संपवत होता.
राज्यकर्त्यांकडून न मिळालेली मदत याच विषयावर शेतकऱ्यांच्या जीवनाची वास्तव दाहकता आपल्याला या चित्रपटात दिसून येते.

ज्वलंत आणि हृदयाला भिडणाऱ्या कथांवर मराठी चित्रपट बनत असल्या कारणामुळेच नेहमीच जगभरातील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारताना पहायला मिळतात. आजवर ‘फास’ या चित्रपटाने देश-विदेशातील विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये १३० पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं असून, मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मनोरंजनाला सामाजिक जाणिवेची जोड देऊन ‘फास’ चित्रपट बनवण्यात आला असून,
“माँ एंटरटेनमेंट”ची प्रस्तुत, माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

समाजाभिमुख कथानक आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचं नैसर्गिक सादरीकरण या ‘फास’च्या मुख्य जमेच्या बाजू आहेत. याला प्रसंगानुरूप गीत-संगीताची जोड देत चित्रपटाच्या कथेत मांडण्यात आलेला विषय प्रेक्षकांच्या मनापर्यंत अचूकपणे पोहोचवण्याचं काम करण्यात आलं आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. रिअल लोकेशन्सवरील चित्रीकरण प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारं ठरणार आहे.

‘फास’ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांचे असून पटकथा अविनाश कोलते यांनी लिहिली आहे. कॅमेरामन रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार ऍलन के. पी. यांनी संगीत दिलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांनी केलं आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns