ट्रेलर वर जाऊ नका चित्रपट बघा ‘टकाटक २’
सचिन चिटणीस….
या चित्रपटास मिळत आहेत साडेतीन स्टार.
मित्रांनी मित्रांमध्ये बोललेली डबल मिनिंगची भाषा दोन तासाच्या चित्रपटांमध्ये आजच्या काळातील तरुणाईची भाषा बोलत तरुणाईला लगेच समजेल अशा पद्धतीने मिलिंद कवडे यांनी या चित्रपटांमधून अतिशय चांगला संदेश दिला असून प्रेक्षकांची अचूक नाडी पकडण्यात यावेळेस देखील मिलींद कवडे यशस्वी झाल्याचे दिसून येते.
डबल मिनिंग चा भरपूर वापर केला असला तरी प्रेक्षकांनी आपापल्या समजेनुसार त्याचा अर्थ लावावा ही मिलिंद कवडे यांची ट्रिक इथे यशस्वी झाली आहे व त्यामुळेच डबल मिनिंग असून देखील कुठेही बिभत्स वाटणार नाही याचं भान राखलं
आहे.
शाळेच्या बंधनातून सुटलेली मुलं कॉलेजमध्ये आल्यावर काय करू आणि काय नको अश्या परिस्थितीत असतात. मात्र अश्या वेळी मुलांनी ( यात मुली देखील आल्या ) सामाजिक भान राखले पाहिजे मुलींबरोबर कितीही घट्ट मैत्री असली तरी दोघांमध्ये एक लक्ष्मणरेखा आखली गेली पाहिजे. असे तरुणाईला कळतील या भाषेत हलक्याफुलक्या पद्धतीने या चित्रपटातून ठळकपणे मुद्दे मांडण्यात आले आहे. ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं मस्त जमून आले आहे.
प्रथमेश परब पासून सर्वच कलाकारांनी यात उत्तम कामगिरी केली आहे.
चित्रपट बघा व इतरांनाही तो बघावयास सांगा इतकेच……