सोमवारपासून लॉकडाऊन टप्प्याटप्याने उठणार, मात्र अजूनही मुंबईकरांना लोकल प्रवासास मुभा नाही

सोमवारपासून लॉकडाऊन टप्प्याटप्याने उठणार, मात्र अजूनही मुंबईकरांना लोकल प्रवासास मुभा नाही

सोमवारपासून राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्याने उठणार असल्याचे परिपात्रक आले असून या नुसार पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
मात्र अजूनही मुंबईकरांना लोकल प्रवासास मुभा नसून, हॉटेल रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी कामगारांचं लसीकरण होणार आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच हॉटेल रेस्टॉरंट उघडली जाणार आहेत.
राज्य सरकारनं जिल्हानिहाय गट तयार केले आहेत.
त्यानुसार, पहिल्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील
लॉकडाऊन पूर्णपणे उठणार असून रेड झोन
वगळता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज
लागणार नाही.

हे पाच स्तर काय आहेत ते आपण पाहू-

पहिला स्तर:
या भागात सर्व प्रकारची दुकाने
पूर्ववत सुरू होणार. मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स,
नाट्यगृहे सुद्धा नियमितपणे सुरू. रेस्टॉरंटसाठीही
परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र
स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास
निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे,
मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला
परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये
उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १००
टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळ,
चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक
कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा,
अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने
नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत
असेल. या भागात जमावबंदीही नसेल.

दुसरा स्तर:
यात जे जिल्हे असतील तिथे सर्व
प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल,
थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के
क्षमतेने सुरू. रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने
परवानगी. लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत
कर्मचाऱ्यांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुर
राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी
असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा.
शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने
सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९
आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील.

तिसरा स्तर:
सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील.

चौथा स्तर:
अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू –
राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने
पूर्णपणे बंद राहतील.

पांचवा स्तर:
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. ३, ४ आणि ५ या स्तरांतील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.

सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा.

शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने
सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९
आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील.
चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक,
सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के
उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी
हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत
जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल,
अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका,
निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम,
सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के
क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १००
टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच
प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी
लागू असेल.

अ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई -विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाणार आहे.

ब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं
प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा
समावेश नसेल)

क) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या
दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या
ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित
करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम
निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय
मान्यतेसाठी पाठवावे लागेल.

स्तर १- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.

स्तर २- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.

स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.

स्तर ५- जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.

• स्तर तीन, चार आणि पाच साठी जिथे दुकानं संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा देणारे तसेच
ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील.

ज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल.
आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.
• एखाद्या प्रवाशाला पासची आवश्यकता असेल त्या ठिकाणी एका वाहनामध्ये असलेल्या सर्वांसाठी वेगवेगळे पास असणे अभिप्रेत आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेगळे पास लागणार
नाहीत.
• सरकारी कार्यालय आणि आपत्कालीन सर्व सेवा तसेच कोविड व्यवस्थापनासाठी 100 टक्के उपस्थितीसह काम केले जाऊ शकते. मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती वर दिलेल्या पेक्षा जास्त असू शकते परंतु त्यासाठी मुख्य सचिव यांची
परवानगी लागेल तर राज्यातल्या इतर भागात त्या त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची परवानगी
आवश्यक असेल.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns