सोमवारी ठाण्यात घडलेला प्रकार हा लांछनास्पद- अभिजीत देशपांडे

सोमवारी ठाण्यात घडलेला प्रकार हा लांछनास्पद- अभिजीत देशपांडे

“या चित्रपटाविषयी जे काय सध्या आक्षेप घेतले जात आहे तेच आक्षेप सेन्सॉर बोर्डाने सुद्धा आम्हाला विचारले होते त्यावेळेस आम्ही इतिहासाचे दाखले सेन्सॉर बोर्डाला दिले आणि त्यानंतरच सेन्सॉर बोर्डाने आम्हाला सर्टिफिकेट दिले त्यामुळे आता आम्हाला यावर काहीच बोलायचे नाही” वझे स्पष्ट शब्दात हर हर महादेव चे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मात्र काल ठाण्यात एक लांछनास्पद प्रकार घडला काही मराठी माणसांनी चित्रपटाला आलेल्या मराठी माणसांनाच शिवीगाळ केली मारहाण केली त्यांना चित्रपट गृहाच्या बाहेर हुसकावून लावले त्यांचे कपडे फाडले, त्यामुळे मला असे वाटले की आमचे जे काय म्हणणं आहे ते समोर येऊन क्लेरिफाय करावं सर्वप्रथम काल घडलेल्या प्रकाराची मी निंदा करत आहे जर आपण शिवाजी महाराजांचे आपल्याला भक्त समजतो तर एकमेकांवर वार प्रतिवार शिवीगाळ करत राहिलो तर मग आपण आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचा.

या चित्रपटाद्वारे आपण चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडत आहात हा आक्षेप आमच्यावर घेतला जात आहे यावर माझे इतकेच म्हणणे काय आहे की,
या चित्रपटात दाखवलेला इतिहास हा काही आम्ही आमच्या मनाने रचिला नसून त्यावर आमच्या टीमने अभ्यास केला आहे त्याचे पुरावे आम्ही सीबीएफसी ( CBFC ) सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, या सेंट्रल गव्हर्मेंट बॉडीला दिले असून या टीम मध्ये तज्ञ तसेच इतिहासकार सुद्धा आहेत व त्यांनी ते तपासल्यानंतरच आम्हाला चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.

१९०६ साली सत्यशोधक इतिहासकार केळुस्कर यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकांमधला रेफरन्स घेऊन आम्ही या चित्रपटात काही सीन्स केले आहेत.

मात्र आमच्या बरोबर न बोलताच आमचे म्हणणे न ऐकताच काल ठाण्यात जो काही गोंधळ घातला गेला त्याचा मी निषेध करतो असे ‘हर हर महादेव’ चे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns