सकारात्मकपणे प्रत्येकाला अंतर्मुख करणारा प्रवास म्हणजे म्होरक्या….

सचिन चिटणीस……… या चित्रपटाला मिळत आहेत चार स्टार

निर्माता-दिग्दर्शक अभिनेते या सर्वांचा पहिलाच चित्रपट असून देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मान मिळवलेला चित्रपट म्हणजे ‘म्होरक्या’, प्रत्येक माणसाला कसला तरी छंद असतो, आवड असते आणि ती आवड जोपासण्यासाठी त्यांची काहीही करायची तयारी असते. या चित्रपटाचा नायक एक १४ वर्षाचा मुलगा असून गणतंत्र दिनाला शाळेत होणाऱ्या परेडचे नेतृत्व करण्यास मिळावे यासाठी तो संघर्ष करत असतो. या कथेतून लोकशाहीतील नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
डोक्यावर कर्ज झाल्याने आपला मुलगा अशोक आशा याला सावकाराकडे मेंढरं चरायला ठेवलेला असतो मात्र एका भयंकर रोगाने अशोकचे वडील मरण पावतात त्यांच्यामागे त्यांची आई, मुकी बायको व अशोक असे तीन जण राहत असतात. अख्खा दिवस मेंढ्या चरायला जावे लागल्यामुळे अशोक शाळेत जात नसतो. परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने वर्गशिक्षिका शाळेतील काही मुलांना अशोकला पकडून आणा म्हणून सांगते त्यामुळे अशोक शाळेत येतो, तेव्हा तिथे गणतंत्र दिवसासाठी परेडची प्रॅक्टिस सुरू असते हे बघून अशोकला आपणही परेड करून त्याचे नेतृत्व करावे असे मनोमन वाटते.

मात्र आपल्याला परेड कोण शिकवणार या चिंतेत अशोक असतो गावात अण्णा म्हणून एक वेडा फिरत असतो व बघावं तेव्हा तो परेड करत असतो. अशोक मनोमन विचार करतो की आपण या अण्णा कडूनच परेड शिकावी मात्र अण्णा सुरुवातीला त्याला भीक घालत नाही पण अशोक जिद्द सोडत नाही शेवटी अण्णाला अशोकला परेड शिकवावी लागते.
अशोक अण्णा कडून परेड शिकतो का?
गणतंत्र दिवसाला अशोक ला परेडचे नेतृत्व कराव्यास मिळते का?
या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपणास म्होरक्या हा हटके चित्रपट पहायलाच हवा.

स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ ची प्रस्तुती असलेला म्होरक्या भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह या चित्रपटातील कलाकार रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अजून एक उल्लेखनीय बाब अशी की या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही म्होरक्याने आपला ठसा उमटवला आहे.

या चित्रपटात रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे या बालकलाकारांसमवेत रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे आणि स्वतः लेखक दिग्दर्शक अमर देवकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील बहुतांशी कलाकारांना चित्रपटक्षेत्राचा अनुभव नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बार्शीसारख्या छोट्या शहरातील आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रपट चित्रित झालेला आहे.

नेतृत्व कसे नसावे असे न मानता नेतृत्व कसे असावे हे अधोरेखित करत, सकारात्मकपणे प्रत्येकाला अंतर्मुख करणारा प्रवास म्हणजे म्होरक्या होय.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns