“रे क्षणा थांबना, गाऊ दे एक गाणे पुन्हा” एकदा काय झाले

सचिन चिटणीस या चित्रपटाला मिळत आहेत 4*

वडील मुलाच्या नाजूक नात्याला स्पर्श केलेली गोष्ट

“ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना,
रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा”
बस हीच या चित्रपटाची गोष्ट चित्रपट संपल्यावर डॉ. सलील कुलकर्णी यांनी या दोन ओळीत चित्रपट बसून काय कमाल केली आहे हे आपल्याला उमजेल.

गोष्टीला आणि गोष्ट ऐकणाऱ्याला वय नसतं. मुळात आपण तात्पर्य सांगत राहतो, मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा. पण जर गोष्ट आवडली तर तात्पर्य आपोआप लक्षात राहते. आपण वेचत राहायला हव्यात गोष्टी आणि वेचता वेचता आपणच त्या गोष्टीतील पात्र बनून राहायला हवे मग बघा कोणताही विषय असो अथवा कोणताही नाजूक मुद्दा असो गोष्टीतून पोहोचवता येतोच आणि तो कायमचा स्मरणात राहतो, आपले सर्वांचे आयुष्य ही एक गोष्ट आहे व ती प्रभावीपणे मांडणाऱ्या किरण ( सुमीत राघवन ) व त्याचा मुलगा चिंतन ( अर्जुन पूर्णपात्रे ) यांची दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी अशाच एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची गोष्ट ‘एकदा काय झाले’ मधून अप्रतिम रित्या सादर केली आहे.

गोष्टी आणि नाटक या माध्यमातून मुलांना शिक्षण देणाऱ्या आगळ्यावेगळ्या नंदनवन शाळेच्या शिक्षकाची व त्याच्या मुलाची ही गोष्ट असून आपल्या बाबाचे सर्व गुण त्याने आत्मसात केलेले आहेत. किरणचे स्वप्न असते स्वतःच अँम्फी थिएटर उभारायचे व त्याद्वारे प्रत्येक महिन्याला एक नाटक करून मुलांच्या मार्फत लोकांपर्यंत गोष्टीतील मतितार्थ पोहचवणे. किरणला सरकारकडून जागाही मिळते, पण अचानक एक घटना घडते आणि किरणचे स्वप्न भंग पावणार असे वाटत असतानाच… चिंतनवर त्याच अँम्फी थिएटर मध्ये गोष्ट सांगण्याची वेळ येते.
“बाबा मला सैनिकाची गोष्ट कळली, मला सगळं कळलं बाबा…….” एकदा काय झालं.

डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘एकदा काय झाले’ या चित्रपटातून एक वेगळा तसेच अफलातून विषय मांडला आहे. लेखनातून सलील यांनी तर कमाल केली आहे. सिनेमॅटीक लिबर्टीला मूठमाती देत सलील यांनी या चित्रपटाचा शेवट हा वास्तववादी केला असून लेखक म्हणून त्याने बाजी मारली आहे. दिग्दर्शन खूपच सुरेख, टप्याटप्याने सलील गोष्ट मांडत जातो आपल्याला सतत कुतूहलात ठेवून पुढे काय होईल हे आपण मनात घोळत असतांनाच सलील आपल्याला धक्का देतो इथे सलील मधला दिग्दर्शक काय ताकतीचा आहे हे लक्षात येते. संगीता बद्दल काय बोलणार ते काय उंचीचे आहे त्याची लिंक खाली दिली आहे ते तुम्ही ऐकूनच ठरवा.

डॉ. काशिनाथ घाणेकर मधील सुमित राघवनच्या अभिनयाचे कौतुक झाले होते पण….. आजवरच्या करियरमधील सर्वात उत्तम अभिनय असेच वर्णन हा चित्रपट बघितल्या नंतर सुमित बद्दल बोलावेसे वाटेल. चिंतनच्या भूमिकेत अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकारानं कमाल केली असून त्याच्या या अभिनयासाठी पुरस्कार तो बनता हैं. उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी यांची अनमोल साथ, पुष्कर श्रोत्रीनं मित्राची भूमिका उत्तम साकारली आहे. इतर सर्वांनीच चांगली साथ दिली आहे.

एकदा काय झालं!!’ हा चित्रपट पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दात्ये, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सौमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे.

YouTube player
YouTube player

 

YouTube player
YouTube player
+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns