“तुम्ही असा सिनेमा करायलाच नाही पाहिजे, हा समाजासाठी विचित्र सिनेमा आहे” सेन्सॉर बोर्ड
“तुम्ही असा सिनेमा करायलाच नाही पाहिजे हा समाजासाठी विचित्र सिनेमा आहे” असे सेन्सॉर बोर्ड चे आरओ मला सांगत होते आणि तेही चित्रपट न बघता याचे मला अतिशय वाईट वाटले. वास्तविक सेन्सॉर बोर्ड ने तुम्ही असा सिनेमा करूच नका हे म्हणणे विचित्र आहे सेन्सॉर बोर्ड चे काम आहे सिनेमा बघून त्याला योग्य ते सर्टिफिकेट द्यावे, बरं मी त्यांना म्हटले सिनेमाच्या शेवटी मी प्रबोधन केले आहे, उपाय पण सांगितला आहे. तेव्हा त्या आरो ( RO ) चे म्हणणे होते अख्खा सिनेमा कोणी पाहतच नाही. आपली व्यथा मांडत होते ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाचे कथा पटकथा तथा दिग्दर्शक नितीन सुपेकर.
सेन्सॉर बोर्डच्या चालढकलीमुळे मजल दरमजल करत ए सर्टिफिकेट स्वीकारत तसेच त्यांनी सुचवलेले बदल करून देखील 19 तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता सेन्सॉर सर्टिफिकेट आमच्या हातात आले. 20 तारखेला चित्रपट रिलीज होत होता मात्र 19 तारीख संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट न आल्यामुळे वितरकांनी माझे शो इतर चित्रपटांना वळवले त्यात वितरकांची काहीही चूक नाही.
एकदा सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांनी चित्रपट बघून हे सर्टिफिकेट दिल्यानंतर व ते सर्टिफिकेट आम्ही स्वीकारल्यानंतरही त्यांचे आरो (RO) म्हणतात मला हा चित्रपट बघायचा आहे हे जरा विचित्रच होते. अखेर दरमजल करत खूप धावपळ करत 19 तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आम्हाला सर्टिफिकेट मिळाले मात्र व्हायचा तोच परिणाम झाला आमचे शो विभागले गेल्यामुळे आम्हाला चित्रपट फार थेएटर मध्ये लावता आला नाही. म्हणूनच हा चित्रपट तीन तारखेला आम्ही पुन्हा रिलीज करत आहोत.
पण का कुणास ठाऊक हे मुद्दाम कोणीतरी केले असे सारखे वाटते आहे. आता सगळं रुळावर आल्यावर मी याबाबतीत रीतसर तक्रार करणार आहे.
एकूणच सेन्सॉर बोर्ड असे विचित्र का वागले सेन्सॉर बोर्ड सदस्यांनी चित्रपट बघून ए सर्टिफिकेट दिल्यावर व दिग्दर्शकांनी ए सर्टिफिकेट स्वीकारल्यावर देखील पुन्हा आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे असे का सांगण्यात आले. तसेच शेवटच्या दिवसापर्यंत सर्टिफिकेट न देण्याचे कारण काय होते या गोष्टीचा मात्र उलगडा दिग्दर्शक नितीन सुपेकर जेव्हा तक्रार करतील त्यानंतर होईल अशी आशा वाटते.