प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील N D स्टुडिओ येथे गळफास लावून केली आत्महत्या.
नितीन देसाई यांनी ९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित ‘तमस’ या दुरदर्शनवरील मालिकेने आपल्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. त्यानंतर १९९४
मध्ये ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला.
देसाई यांचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. ते या
आठवड्यात ५८ वर्षात पदार्पण करणार होते. पण
वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांनी आपले जीवन संपवले, दोन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि इतरांसह अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होते.
केवळ चित्रपटच नाही तर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे अनेक सीझनही त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आले होते.
नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं होतं.
2000 मध्ये त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता
नितीन देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य उल्लेखनीय कामं केली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांनी अवघ्या 20 तासांच मंच उभारला होता. मुंबईतील शिवाजी पार्कात हा भव्य मंच उभारण्यात आला होता. शपथविधीच्या कार्यक्रमानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं होतं. या कार्यक्रमातील सर्वांत विशेष बाब म्हणजे सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची विशालकाय मूर्ती. ही संपूर्ण व्यवस्था नितीन देसाई यांनी 20 तासांत केली होती.
नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. देसाईंनी त्यांच्या शाळेत वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड येथे मराठी माध्यमात शिक्षण घेतले होते. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. १९८७ साली त्यांनी चित्रपट सृष्टीमधील कारकीर्द सुरूवात केली.
नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट
– परिंदा (1989)
– 1941- ओ लव्ह स्टोरी (1993)
– आ गले लग जा (1994)
– अकेले हम अकेले तुम (1995)
– खामोशीः द म्युझिकल (1996)
– दिलजले (1996)
– माचीस (1996)
– इश्क (1997)
– प्यार तो होना ही था (1998)
– हम दिल दे चुके सनम (1999)
– बादशहा (1999)
– जोश (2000)
– मिशन कश्मीर (2000)
– वन टू का फोर (2001)
– द लेजेन्ट ऑफ भगतसिंग (20002)
– मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2003)
– लगे रहो मुन्नाभाई (2006)
– धन धना धन गोल (2007)
– गॉड तुस्सी ग्रेट हो (2008)
– दोस्ताना (2008)
– वन्स अपॉन टाइम्स इन मुंबई (2009)
– बालगंधर्व (2011)
मे महिन्यात एका जाहिरात एजन्सीने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने देसाई यांच्यावर ५१.७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तीन महिने काम करूनही देसाईंनी पैसे न दिल्याचा आरोप एजन्सीने केला होता. पण, नितीन देसाईंनी हे आरोप फेटाळून लावले होते. यापूर्वीही एजन्सीने आपल्यावर असेच आरोप केल्याचा पलटवारही त्यांनी केला होता.
नितीन देसाई यांनी काही कारणांस्तव ‘सीएफएम’ वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा वेगवेगळ्या दोन वर्षांमध्ये कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या. काही कालावधीनंतर ‘सीएफएम’ या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली; परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. १८० कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र व्याजासह ३ मे २०२२पर्यंत कर्जाची रक्कम सुमारे
२४९ कोटी रुपयांवर पोचल्याचे सूत्रांनी सांगितले.