मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे-
या पुढे कोरोना रुग्णांची विभागणी ४ विभागात, प्रत्येक विभागात फिवर क्लिनिक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या क्लिनिक मध्ये संशयिताला तपासले जाईल व पुढे कुठे जायचं हे त्याला सांगितले जाईल.
यात तीन हॉस्पिटलची तीन विभागात विभागणी केलेली आहे.
आपण कोविड हॉस्पिटल ची मांडणी करतो आहोत.
ज्यांना सौम्य लक्षणे आहेत ते एका हॉस्पिटलमध्ये जातील,
ज्यांना लक्षणांची थोडी अधिक तीव्रता असेल ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातील.
ज्यांना तीव्र किंवा गंभीर लक्षण असतील ते तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातील.
तिसरे हॉस्पिटल हे पूर्णपणे सुसज्ज असेल.
आपण सगळेजण घरी बसून कंटाळले असाल त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आपल्याकडे दुसरे काही औषध, नाही त्यामुळे घरी बसूनच आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे.
अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.
चार आठवड्यात कोरोना ग्रस्तांच्या संकेत वाढ झालीये हे खरे आहे.
खाण्यावर निर्बंध नाही पण एक गोष्ट नक्की सांगतो मधुमेह रक्तदाबाचा विकार असेल त्यांनी आपलं खाणं हे थोडंसं नियंत्रणात ठेवायला पाहिजे.
हा महत्त्वाचा काळ आहे घरी राहा तंदुरुस्त रहा योगासन करा व्यायाम करा.
यापुढे आपल्याला एकाही रुग्णाची वाढ झालेली नकोय.
कोरोना नंतर आपल्याला अर्थव्यवस्थेची लढाई लढायची आहे.
व्यायाम केलात तर मानसिक युद्ध लढायला बळ मिळेल
साडेपाच सहा लाख लोकांना जेवण मिळत असून, तीन वेळच्या खाण्याची सोय सरकारने केली आहे.
माणुसकीच्या नात्याने गरजूंना अन्नछत्रांची व्यवस्था केली आहे.
केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे मात्र केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेत फक्त तांदूळ दिले जात आहेत तेही फक्त लाभार्थ्यां साठी, राज्यसरकार केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देत आहे.
जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क जरूर वापरा.
सैन्यामध्ये आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त कर्मचारी अधिकारी निवृत्त नर्स, वॉर्डबॉय ज्यांनी आरोग्यसेवेचे प्रशिक्षण घेतले असेल त्यांनी कोरोनाला हरवण्याच्या युध्दात सहभागी व्हावे असे मी आवाहन करत आहे.