‘ओह माय गॉड 2’ ला मिळाले ‘A’ सर्टिफिकेट

‘ओह माय गॉड 2’ ला मिळाले ‘A’ सर्टिफिकेट

धार्मिक भावना दुखावतील या कारणाने अक्षय कुमार चा ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. पण अखेर तब्बल २० बदल सुचवत तसेच लैंगिक शिक्षणाचा मुद्दा या चित्रपटात आल्याने आणि सिनेमातील काही दृश्यांमुळे ‘ओह माय गॉड 2’ ला सेन्सॉर बोर्डाने ‘A’ सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे आता हा सिनेमा फक्त प्रौढांनाच पाहता येणार आहे.

‘ओएमजी 2’ या सिनेमाचं कथानक होबोफोबियावर आधारित आहे. त्यात लैंगिक शिक्षणाचाही भाग असल्याचं समोर आलं होतं. या सिनेमाच्या कथेतील मुलगा समलैंगिकतेच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या करतो. त्यानंतर शिवभक्त असलेले पंकज त्रिपाठी लोकांना होमोफोबियाबद्दल जागरूक करण्याचा वसा घेतात.

सेन्सॉर बोर्डाला सर्वात मोठी अडचण हीच होती की सिनेमात अक्षय कुमारला भगवान शंकराच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे आणि फिल्मचा विषय सेक्स एज्युकेशनवर आधारित आहे. त्यामुळे सिनेमा बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे अक्षयच्या भूमिकेत मोठा बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिनेमात आता अक्षय भगवान शंकराचा दूत आणि शिवभक्त म्हणून समोर येईल ना की खुद्द महादेव.

अजित अंधारे यांनी ट्वीट करत लिहिले, ‘ओह माय गॉड २ च्या रिलीज मार्ग मोकळा झाल्याचं सांगताना मला आनंद होतोय. फिल्म ११ ऑगस्टला रिलीज होत आहे. फार मोठे कट्स नाहीत फक्त काही बदल करण्यात आले आहेत जे प्रक्रियेचा भाग आहेत. थिएटर्समध्ये भेटू.’

IPRoyal Pawns