सचिन चिटणीस या चित्रपटास मिळत आहेत 3 स्टार
शहाणपण शिकवणारे ‘उनाड’पण
प्रत्येक आईबापाला आपला मुलगा सरळमार्गी असावा त्याने अभ्यासात खूप प्रगती करावी जेणे करून त्याला चांगली नोकरी लागेल व तो मार्गाला लागेल ही आशा असते. मात्र प्रत्येक मुलगा तसा निघेलच असे नाही. काही मुलं खोडकर असतात तर काही वाममार्गाला लागलेली असतात तर काही उनाड असतात मात्र या उनाडपणात सुद्धा त्यांच्यातील माणुसकी जागृत असते मात्र अचानकपणे घडलेल्या एका गोष्टी मुळे त्या तिघांचे आयुष्यच बदलून जाते, आणि त्यांचीच ही कथा म्हणजे ‘उनाड’.
कोकणातील समुद्रकिनारी कोळी वस्तीत राहणाऱ्या तीन घट्ट मैत्री असलेल्या शुभम ( आशुतोष गायकवाड ) बंड्या ( अभिषेक भरते ) आणि जमील ( चिन्मय जाधव ) या तरुणांची कथा. शुभमचे वडील (देवेंद्र पेम) मच्छीमारीसाठी बोटीवर असतात.
बंड्याची आई ( देविका दप्तरदार ) मासेविक्री करत असते तर जमिलचे वडील सौदी मध्ये काम करत असतात व जमीलला पण तिथे नौकरी साठी प्रयत्नात असतात.
अख्खा दिवस गावात उनाडक्या करण्यातच यांचा दिवस जात असतो याची त्यांना ना खंत असते ना बोच बंड्याच्या वर्गात त्याला आवडणारी एक मुलगी असते, तिची मैत्रीण स्वरा ( हेमल इंगळेची ) ही ही पुण्याहून गावाला कब्बडी मॅच खेळण्यासाठी आलेली असते शुभमला स्वरा आवडू लागते स्वराला सुद्धा शुभमची साथ आवडते मात्र निखळ मित्र म्हणून. मात्र एका अवखळ क्षणी शुभम स्वरा च्या अधिक जवळ जाऊ पहातो व ते स्वराला आवडत नाही ती त्याला फटकारते व निघून जाण्यास सांगते स्वराच्या अजून एक मित्र पराग हे सगळं बघतो आणि रस्त्यात शुभमला रस्त्यात गाठून मारतो या प्रकारामुळे घाबरून शुभम समुद्रातील एका बोटीत लपतो इथे शुभमची गैरसमजुती मुले स्वराची बहीण जीव द्यायचा प्रयत्न करते.
ही बोट १५ दिवसांसाठी मच्छीमार करण्यासाठी खोल समुद्रात जाते इथे पोलीस शुभमचा शोध घेत असतात त्यांना वाटते शुभम फरार झाला आहे या सर्व प्रकरणात जमील व स्वराची बहीण दोघेही भरडले जातात.
शुभमचे काय होते ? स्वरा शुभम ला माफ करते का ? जमील आखाती देशात जाऊन नोकरी करू शकतो का ? बंड्याचे जीवन मार्गी लागते का ?
या सर्व प्रश्नांची उकल आपल्याला ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चित्रपट बघूनच कळेल
थोडासा संथ गतीने सुरू झालेला चित्रपट मध्यंतरात एकदम गती घेतो मात्र मध्यंतरानंतर पुन्हा तो संथ होतो पुन्हा शेवटाकडे जाताना चित्रपट गती घेतो त्यामुळे प्रेक्षकाला मध्ये मध्ये थोडा कंटाळा येऊ शकतो.
चित्रपटाची सर्वांगसुंदर बाजू असेल तर निसर्गरम्य कोकण, तिथले समुद्र किनारे, खोल दुरवर पसरलेले पाणी, गावं, गर्द हिरवे पण, या सगळ्याचं केलेलं विलोभनीय असं चित्रीकरण, ड्रोनच्या साह्याने टिपलेली विहंगम दृश्य, कोकणातील पर्यटनच घडुन आणते, समुद्रात खोलवर मच्छीमारी करणाऱ्या होड्या, सभोवार पाणी, याचं चित्रिकरण सहजच कोकणसफरीला घेऊन जातं, त्यामुळे नेत्रसुख मिळते.
आदित्य सरपोतदार याने अतिशय उत्कृष्टपणे चित्रपटाचा विषय हाताळला आहे. सर्व पात्रां कडून दिग्दर्शकाने उत्तम अभिनय काढून घेतल्याचे जाणवते. त्यामुळे सर्वांचाच अभिनय सुंदर झाला आहे.
एकूणच कोकणात उनाडक्या करायच्या असतील तर ‘उनाड’ बघावयास हवा.