पत्याच्या राणीला खऱ्या राणीचा दणका….

पत्याच्या राणीला खऱ्या राणीचा दणका….

सचिन चिटणीस…या चित्रपटाला मिळत आहेत 2.5 स्टार
आजच्या युगात आपणास पत्ते खेळताना कोण दिसल्यास आपण पटकन बोलून जातो आणि काय जुगारी दिसतोय म्हणजेच पत्ते खेळणे हे वाईट हे आपण ठरवूनच टाकलेले असते पण जर पत्ते हे फक्त मनोरंजनासाठी खेळले गेले तर खूपच धमाल येते व टाइमपासही चांगला होतो. पूर्वीच्या काळी पत्ते खेळणे हे एक प्रेस्टीज इशू होता अगदी महाभारतात खेळल्या गेलेल्या पत्त्यांमुळे पुढे काय परिस्थिती घडली हे सगळे आपण जाणतात. असाच आपला नायक भिकाजी वखरे ( ओंकार भोजने ) पत्याचा प्रचंड शौकीन कुठे पत्ते दिसले की हा बसला खेळायला बरं याचं नशीब पण एवढं ना की हा प्रत्येक खेळात जिंकतच आलाय.

भिकाजीचे सरला ( ईशा केसकर ) बरोबर लग्न होते सरला दिसावयास अतिशय सुंदर, अख्या गावामध्ये तिच्या इतकी सुंदर कोणी नव्हती त्यामुळे गावातील लोक सरलाच्या मागे लागली होती त्यात ठेकेदार बब्बु ( जतीन ईनामदार ) सरलाच्या फारच मागे लागला होता एक दोनदा त्याने तिच्यावर अतिप्रसंग करावयाचा प्रयत्न केलेला असतो पण सरला त्याला बिलकुल दाद देत नाही.

तेव्हा तो त्याच्या मामाच्या मदतीने भिकाजीला पत्यात हरवतो व भिकाजी अडकला गेल्यावर भिकाजी आपल्या पत्नीला शेवटच्या डावात लावतो पण हरतो.

ठेकेदार त्याला म्हणतो एकतर माझे हरलेले 1 लाख रुपये दे नाहीतर तुझी बायको घेऊन जातो या साठी 10 दिवसांची मुदत देतो. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते व भिकाजीचे लहानपणापासून चे मित्र ही उलटत कोणी भिकाजीला 2 लाख तर कोणी 3 लाख द्यावयास तयार होतात. मात्र अट एकच ती म्हणजे सरलाला आमच्या कडे सोडायचे.

मजल दरमजल करत भिकाजी आमदारांकडे जातो त्यांना पैसे देण्याची विनंती करतो मात्र आमदार सुद्धा त्याच उद्देशाने त्याला पैसे द्यायला तयार होतो त्यामुळे भिकाजी नाउमेद होतो मात्र तो शहरात आमदाराला भेटायला गेला असता टीव्ही अँकर आमदाराची उलट तपासणी घेताना तो बघतो व त्याच्या व सरलाच्या मनात एक प्लॅन तयार होतो.

तो प्लॅन काय असतो तसेच चित्रपटाचे नाव ‘सरला एक कोटी’ याचा अर्थाअर्थी काय संबंध आहे हे शेवटच्या 20 एक मिनिटात जबरदस्त टीवट्स सह बाहेर येते आणि आपण प्रेक्षक अवाक होतो.

इथे दिग्दर्शकाचे कौशल्य दिसते, ओमकार भोजनेचा हिरो म्हणून हा पहिलाच चित्रपट आणि ओमकार ने या चित्रपटात जान ओतून काम केले आहे इशा केसरकर उत्तम ठेकेदार बब्बू याने मस्त काम केले आहे आपणास त्याचा खूप राग येतो. छायांकन – नागराज दिवाकर उत्तम एकंदरच हा एक वेगळा चित्रपट म्हणून बघावयास काहीच हरकत नाही.

 

निर्मिती संस्था – सानवी प्रॉडक्शन हाऊस

निर्माती – आरती चव्हाण

कथा, पटकथा आणि दिग्दर्शन – नितीन सिंधुविजय सुपेकर

संवाद – महेंद्र खिल्लारे

गीत – गुरू ठाकूर, विजय गवंडे

छायांकन – नागराज दिवाकर

संकलन – नितेश राठोड

संगीत/  पार्श्वसंगीत  – विजय नारायण गवंडे

ध्वनी आरेखन  – निखिल लांजेकर, हिमांशु आंबेकर

नृत्यदिग्दर्शन  – सुजीत कुमार

वेशभूषा  –किर्ती जंगम

रंगभूषा  – संतोष गिलबिले

कलादिग्दर्शन – नितीन बोरकर

*कलाकार*

भिकाजी वखरे –  ओंकार भोजने

सरला वखरे – ईशा केसकर

मथुरा वखरे – छाया कदम

बब्बु – जतीन ईनामदार

नारायण सावकार – कमलाकर सातपुते

सावकार बायको – अपेक्षा निर्मल

दिनकर शिंगाडे – यशपाल सरताप

झाप्या – महेंद्र खिल्लारे

मामा – रमाकांत भालेराव

गुड्डी – वनिता खरात

इस्माईल – कपिल कांबळे

हलीमा –  नम्रता इंगळे

कलीमा – प्राजक्ता सुपेकर

फातीमा – अपूर्वा कदम

इस्माईल मुलगी ( १० वर्ष ) – स्वरा कोरडे

इस्माईल मुलगी ( ६ वर्ष ) – ईरा गोडबोले

सोन्या – शाम मते

बाचक्या – शुभम खरे

मुकादम – रमेश परदेशी

लता – चैत्राली रोडे

सखाराम – विजय कसवटे

आमदार भैय्या पाटील – सुरेश विश्वकर्मा

आमदार पी. ए – योगेश इरतकर

पक्षश्रेष्ठी – विजय निकम

रशियन मुलगी – एलिना तुतेजा

रशियन बॉयफ्रेंड – अक्षय राज

मदन झोंबडे – अभिजीत चव्हाण

काळे ( हवालदार ) – संतोष वडगीर

माने ( हवालदार ) – पंकज

दोडके ( हवालदार ) – संघपाल टायडे

मोर मॅडम ( हवालदार ) – अक्षदा भोळे

आरोपी ( मारत्या ) – उमेश राजहंश

दुर्गा काळे ( रिपोटर ) – अभिलाषा पॉल

निखिल ( न्यूज हेड ) – आदित्य दुर्वे

गणेश ( दुर्गा कॅमेरामन ) – संदेश वीर

पक्षश्रेष्ठी पी. ए – प्रशांत जाधव

रत्ना – ज्ञानेश्वरी देशपांडे

मोगरा – सारिका काची

धुरपा – बेबी अशोक साळोखे

हौसा – प्राजक्ता चव्हाण

आप्पा – प्रकाश मोरे

सरपंच काका – विकाश निकम

मामा ( काळं घोडा ) – बालाजी सावंत

चांग्या ( हॉटेलवाला ) – निलेश आग्रवाल

आमदार ड्रायवर – केदार दिवेकर

दूसरा ड्रायवर – संतोष मोरे

मेंढपाळ – विशाल शिरतोडे

गुड्डीचे वडील – उमेश वास्वामी

गावकरी ( टपरी ) संदीप चुटके

बारक्या चहावाला – सुरज

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns