*प्रीपेड ग्राहकांना प्रीमियम मनोरंजनाचा अनुभव देण्यासाठी एअरटेलची यूट्यूबसोबत भागीदारी*
*मुंबई, २३ ऑक्टोबर २०२६:* ग्राहकांसाठी मोबाईल डेटा आता केवळ संपर्कात राहण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. विविध कार्यक्रम आणि चित्रपट पाहणे, आवडत्या कंटेंट क्रिएटर्सना फॉलो करणे, संगीत ऐकणे तसेच नवनवीन कंटेंट शोधणे यासाठी मोबाईल डेटा महत्त्वाचे माध्यम बनला आहे. ग्राहकांच्या मोठ्या वर्गामध्ये दिसून येणारी ही बदलती वापराची पद्धत लक्षात घेऊन आणि त्याला आपल्या सर्वोत्तम सेवांची जोड देण्यासाठी एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी *यूट्यूब प्रीमियम* उपलब्ध करून देण्याकरिता यूट्यूबसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना *यूट्यूब शॉर्ट्ससह जाहिरातमुक्त यूट्यूबचा अनुभव* घेता येणार आहे. त्यासोबत बॅकग्राऊंड प्ले, ऑफलाइन डाउनलोड आणि *यूट्यूब म्युझिक प्रीमियमचाही* लाभ मिळणार आहे. *अटी व शर्ती लागू.
आज ग्राहक आपल्या मोबाईलचा ज्या पद्धतीने वापर करतात, त्यातील बदल ही सेवा अधोरेखित करते. कंटेंट क्रिएटर्सना फॉलो करणे, आवडते कार्यक्रम पाहणे, संगीत ऐकणे आणि नवीन कंटेंट शोधणे यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर मोबाईल डेटाचा वापर करत आहेत. आता यूट्यूब प्रीमियमचाही एअरटेलच्या मनोरंजन सेवांमध्ये समावेश झाला आहे. *प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार, झी5 प्रीमियम, सोनीलिव्ह आणि इतर 18 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह या सर्व सेवा ₹200 च्या ओटीटी टॉप-अपमध्ये 30 जीबी अतिरिक्त डेटासह उपलब्ध आहेत.*
यूट्यूब प्रीमियमच्या समावेशामुळे एअरटेल आपल्या प्रीपेड मनोरंजन सेवांचा आणखी विस्तार करत आहे. यामुळे कार्यक्रम आणि चित्रपटांचे स्ट्रीमिंग करण्यापासून ते कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ पाहणे, संगीत ऐकणे आणि नवीन कंटेंट शोधणे अशा ग्राहकांच्या मनोरंजनाच्या विविध गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होणार आहेत. *डेटा, प्रीमियम मनोरंजन आणि विविध डिजिटल अनुभव एका परवडणाऱ्या पॅकमध्ये एकत्र आणून एअरटेल कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. यातून ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजांशी अधिक सुसंगत आणि उपयुक्त मूल्य देण्याचा एअरटेलचा प्रयत्न कायम आहे.*
हा टॉप-अप *सक्रिय रिचार्ज असलेल्या एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी त्यांच्या विद्यमान प्रीपेड प्लॅन्सवर* उपलब्ध आहे. टॉप-अप खरेदी केल्यानंतर ग्राहक *एअरटेल ॲपमधील ‘रिवॉर्ड्स अँड ओटीटीज’ विभागातून* यूट्यूब प्रीमियमचा लाभ घेऊ शकतात.
मनोरंजनाशी संबंधित हे सर्व लाभ *टॉप-अपच्या 28 दिवसांच्या वैधतेपर्यंत* उपलब्ध राहतील. ही वैधता संपल्यानंतर ग्राहकांना यूट्यूब प्रीमियमचा लाभ सुरू ठेवायचा असल्यास ते पुन्हा हा टॉप-अप खरेदी करून यूट्यूब प्रीमियमचा लाभ घेऊ शकतात.





























