अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान

अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान

बृहन्महाराष्ट्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून परदेशात कार्यरत आहे. यावर्षी त्यांनी विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून अक्षय बर्दापूरकर यांना गौरवण्यात आले.

हल्ली मराठी चित्रपट, वेबसिरीज व मराठी कन्टेन्टला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजन विश्वात अग्रेसर ठरणाऱ्या आणि जगातील पहिलाच मराठी ओटीटी माध्यम असणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’ने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगभरात प्लॅनेट मराठी ओटीटीचे चाहते आहेत. अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे नुकताच पार पडलेल्या बीएमएम म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात ‘अक्षय बर्दापूरकर’ यांना ‘सर्वोत्कृष्ट उद्योजक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोविडमुळे २ वर्षाचा खंड पडलेला हा कार्यक्रम यावर्षी दणक्यात पार पडला.
“अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बृहन्महाराष्ट्र मंडळाने दिलेला हा पुरस्कार मराठी सिनेयुगाला एक नवीन स्थरावर पोहचवणारा ठरला आहे . पूरस्काराच्या सुरुवातीच्या वर्षातच हा पुरस्कार मला मिळणं हि माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”, अशी प्रतिक्रिया अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केली. प्लॅनेट मराठी निर्मित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाबरोबरच ‘सहेला रे’, ‘सनी’ आणि तब्बल दहाहून अधिक मराठी चित्रपट आणि वेब सिरीज आगामी काळात प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याची घोषणाही अक्षय बर्दापूरकर यांनी यावेळी केली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns