श्रेया चौधरी झळकणार आयुष्मान खुरानासोबत ‘मुपापा’मध्ये

श्रेया चौधरी झळकणार आयुष्मान खुरानासोबत ‘मुपापा’मध्ये, 19 फेब्रुवारी 2027 रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

बंदिश बँडिट्सच्या सीझन 1 आणि 2 तसेच अमेज़न प्राइम वीडियो वरील द मेहता बॉईजमधील उल्लेखनीय अभिनयामुळे आपल्या पिढीतील आघाडीच्या आणि आश्वासक अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी श्रेया चौधरी आता आगामी मुपापा या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

समीर सक्सेना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या मुपापाची निर्मिती यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी आणि पोशम पा पिक्चर्स यांनी केली आहे. समीर सक्सेना यांनी बिस्वपती सरकार, सौरभ खन्ना आणि अमित गोलानी यांच्यासोबत पोशम पा पिक्चर्सची सह-स्थापना केली आहे. या स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊसमधील हे पहिले थिएट्रिकल कोलॅबोरेशन आहे.

नैसर्गिक अभिनय आणि आपल्या व्यक्तिरेखांमध्ये भावनिक खोली निर्माण करण्याच्या सहज क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयाने आपल्या वैविध्यपूर्ण कामातून प्रेक्षकांशी मजबूत कनेक्ट निर्माण केला आहे. बंदिश बँडिट्सच्या दोन्ही सीझनमधील तिच्या अभिनयाचे नैसर्गिक आणि रिलेटेबल सादरीकरणासाठी कौतुक झाले, तर द मेहता बॉईजमधून तिची वर्सेटिलिटी आणि लेयर्ड व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता आणखी ठळकपणे समोर आली.

मुपापाच्या माध्यमातून श्रेया आपल्या करिअरमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत आहे. आयुष्मान खुरानासोबतचा हा थिएट्रिकल रिलीज अभिनेत्री म्हणून तिच्या प्रवासातील एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची सुरुवात ठरणार आहे.

करिअरमधील आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून श्रेया चौधरीला वायआरएफ टैलेंट ने एक्सक्लुझिव्ह मॅनेजमेंटसाठी साइन केले आहे. तिच्या प्रोफेशनल प्रवासातील हा एक नवा अध्याय आहे. आता ती यश राज फिल्म्सच्या टॅलेंट मॅनेजमेंट आर्म वायआरएफ टैलेंट चा भाग झाली आहे. वायआरएफ टैलेंट कडे इंडस्ट्रीतील प्रस्थापित कलाकारांसोबतच नव्या पिढीतील काही आश्वासक कलाकारांचा प्रभावी रोस्टर आहे. यामध्ये राणी मुखर्जी, आयुष्मान खुराना, सोनम कपूर, वाणी कपूर, शर्वरी, अहान पांडे, अनीत पड्डा यांच्यासह इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे.

वैयक्तिक प्रोजेक्ट्सपुरते मर्यादित न राहता टॅलेंटच्या दीर्घकालीन करिअरला आकार देण्यावर वायआरएफ चा विशेष भर आहे. आपल्या कलाकारांसोबत जवळून काम करत त्यांच्या लॉन्ग-टर्म करिअरला दिशा देणे, स्ट्रॅटेजिक ब्रँड आणि कमर्शियल संधी निर्माण करणे तसेच सिनेमा, एंडोर्समेंट्स, फॅशन, डिजिटल आणि व्यापक एंटरटेनमेंट लँडस्केपमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, यासाठी वायआरएफ टैलेंट काम करते.

IPRoyal Pawns