‘घबाडकुंड’ थोडीशी उत्सुकता, थोडासा थरार!
..सचिन चिटणीस या चित्रपटास मिळत आहेत. ⭐⭐⭐
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या हॉररपटांची एका मागोमाग एक लाईन लागली असून त्याला बऱ्यापैकी प्रेक्षकांकडून रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत आहे. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह ‘घबाडकुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांना रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी आपल्या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करतो . मात्र तो तितकासा सफल झालेला नाही. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्य फारच कमी वेळ अनुभवास मिळतात.
‘घबाडकुंड’मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांची पकड थोडी सैल झाल्यावर सारखी वाटते.पहिल्या भागात हे प्रकर्षाने जाणवते.
रहस्यमय आणि गूढ गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. याच गूढतेचा आणि थराराचा अनुभव ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना मिळणार या आशेवर आपण चित्रपट बघायला गेल्यास आपली थोडीफार निराशा होण्याची शक्यता आहे. नाही म्हणायला चित्रपटाच्या शेवटी भूतां मधली मारामारी ही उत्कृष्ट जमून आली आहे तसेच विहिरीच्या आतील वातावरण बऱ्यापैकी भयावह व खरे वाटते. विहिरीत लपवलेल्या घबाडाच्या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण एका धोकादायक प्रवासाला निघतात; मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचं भयावह वास्तव! ‘घबाडकुंड’ मध्ये नेमकं काय दडलं आहे? आणि या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता मोठ्या पडद्यावरच पाहण्यात मजा आहे.
रहस्य, भय, थरार आणि अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचा संगम असलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे. शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिकेने अतिशय ओव्हर एक्टिंग केली असून शेवटी शेवटी ती नकोशी वाटते. प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.
‘घबाडकुंड’मधील रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. १९ जूनपासून हा अनोखा सिनेमॅटिक प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की चित्रपटगृहात जावे.
































