सुभाष म्हेतर यांच्या कुंचल्यातून साकारताहेत देखण्या गणेश मूर्त्या

सुभाष म्हेतर यांच्या कुंचल्यातून साकारताहेत देखण्या गणेश मूर्त्या


मिलींद बेर्डे
लांजा -: मूर्ती कलेबाबत घरात कोणतीही पार्श्वभूमी नसताना आईने शालेय वयातच दिलेले प्रोत्साहन आणि त्यासाठी प्रसंगी लहानग्या सुभाष याला पाठीवर घेऊन गणेश मूर्ती कारखान्यात गणेश मूर्ती घडविण्याचे, त्यातील बारकावे शिकण्याचे दिलेले प्रोत्साहन यातून आवड निर्माण झाली आणि आज गेली बावीस वर्षे स्वतःच्या ओम साई गणेश कारखान्यात तो मूर्ती घडवतोय. त्याच्या हस्तकौशल्या तून आणि कुंचल्यातून साकारलेल्या गणेश मूर्ती जितक्या देखण्या तितक्याच विलोभनीय.अशा या जिद्दी गणेश मूर्तीकाराचे नाव आहे सुभाष म्हेतर.
अपंगत्वाची कोणतेही किल्मिष वा कमीपणा न बाळगता आणि आपल्या नशिबाला दोष न देता आईने दिलेल्या लहानपणी दिलेल्या बाळकडू चा वापर करून सुभाष म्हेतर हि लांजातील एक प्रख्यात गणेश मूर्तिकार बनला आहे. लांजा तालुक्यातील प्रभांवल्ली हे मूळ गाव असलेले सुभाष म्हेतर गेली २४ वर्ष गणेश मूर्ती कारखान्यात गणेश मूर्ती घडवत आहेत.
मूळचे लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावचे रहिवाशी असलेल्या सुभाष तुकाराम म्हेतर हे लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग आहेत. मात्र त्यांच्या आईने जिद्दीने त्यांना शिक्षण पुर्ण करण्यास मदत केली. आपला मुलगा स्वबळावर, स्वतःच्या हिमतीने मोठा व्हावा यासाठी सुभाष यांच्या आईने लहानपणापासूनच स्वयम् शिस्तीचे धडे दिले होते. शालेय शिक्षण सुरू असताना त्यांची आई सुभाष याला पाठीवर घेऊन वाकेड येथील गणेश चित्र शाळेत घेऊन जायची. आपल्या मुलाने दुःख हर्ता असलेल्या बाप्पाच्या मुर्ती बनवण्याची कला आत्मसात करावी अशी तिची इच्छा होती. आईची ही इच्छा लक्षात घेऊन सुभाष म्हेतर यांनी या मूर्ती कलेतील बारकावे, रंगकाम, मूर्ती घडविण्याची कला सारे काही शिकून घेतले. आणि सन १९९८ मध्ये त्यांनी प्रभानवल्ली येथे आपला स्वतःचा गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला.
दोन्ही पायाने अपंग असतानाही त्यांनी आपण कोठेही कमी पडणार नाही या इर्षेने हा कारखाना नेटाने सुरू केला. सुरुवातीला प्रभानवल्लीसह आजूबाजूच्या गावात त्यांच्या गणेश मूर्तींना मागणी वाढू लागली .सुरूवातीला त्यांच्या कारखान्यात
१९ मुर्त्या बनवल्याचे सुभाष म्हेतर यांनी सांगितले.
यानंतर मूर्तिकलेत जम बसल्यानंतर सन २०१५ मध्ये त्यांनी लांजा येथे आपल्या ओम साई गणेश मूर्ती कारखाना सुरु केला. त्यांच्या हस्तकला कौशल्यातून साकारण्यात येणाऱ्या गणेश मूर्त्यांना लांजा शहरासह प्रभानवल्ली, भांबेड, कोर्ले, पन्हळे, जावडे, वाकेड, राजापुर तालुक्यातील परटवली आदी ठिकाणी मागणी आहे . त्यांच्या कारखान्यात शाडूच्या मूर्तीनाच प्राधान्य असते. सध्या त्यांच्या कारखान्यात १७५ गणेश मुर्त्या बनवल्या जात आहेत. या गणेश मूर्ती बनवण्यामध्ये त्यांना भाऊ महेश तसेच वहिनी तसेच त्यांची पत्नी संचीता यांचे देखील सहकार्य लाभते असे सुभाष म्हेतर यांनी सांगितले.
सध्याच्या महागाईच्या काळात देखील गणेश भक्तांना माफक दरात मूर्ती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या कारखान्यात विविध आकारातील गणेश मुर्त्या तयार केल्या जातात .सध्या रंगाच्या दरात 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र तरीही आपल्या ग्राहकांना गणेश मूर्तींच्या किमतीत फार वाढ न करता योग्य दरात उपलब्ध करून देण्याचे त्यांनी बोलून दाखवले .मध्यंतरी त्यांच्या मुर्त्या मुंबईला देखील पाठवण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत त्यांच्या कारखान्यात १ हजार रुपयांपासून ते ५००० रूपये किंमतीच्या मूर्त्या बनविण्यात येत आहेत.
अपंगत्वाचे कोणतेही न्यूनगंड न बाळगता बाप्पा वर असलेल्या प्रगाढ श्रद्धेतून सुभाष मेतर यांच्या कारखान्यात बनणाऱ्या मुर्त्या म्हणजे सुभाष म्हेतर यांच्या हस्त कौशल्याचा एक नमुना दिसून येतो.

*ओम साई गणेश कारखान्यात मूर्ती घडवताना सुभाष म्हेतर*

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns