अनन्यसाधारण समयाराच्या प्रवासाची छोटीशी झलक

अनन्यसाधारण समयाराच्या प्रवासाची छोटीशी झलक

‘ समायरा म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड ‘ नावाप्रमाणेच समायराचा प्रवास आहे. प्रश्नांच्या विळख्यात सापडलेली समायरा कशी अध्यात्माच्या उंबऱ्यावर येऊन थांबते. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली ‘समायरा’ आणि तिचा अनन्यसाधारण प्रवास खूप काही शिकवून जाणार यात काही शंकाच नाही. नुकताच ‘समायरा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात आपल्याला दिसले की, आयुष्यात स्वतःच स्वतःला उलगडण किती महत्त्वाचं असतं. ह्याच तिच्या प्रवासात तिला जिवाभावाचा साथीही भेटला.

आई-वडिलांच्या शोधात निघालेली ‘समायरा’ कशी स्वतःच स्वतःला उलगडतेय आणि तिच्या आयुष्याचे काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे हळूहळू समोर येतेय, हे या ट्रेलरमधून कळतेय. आजच्या नव्या पिढीला अध्यात्माचे महत्व हा चित्रपट घडवून देईल, असे ट्रेलर पाहून वाटत आहे. ‘समायरा’चे आणि तिच्या साथीदाराचे हळुवार उलगडत जाणार नाते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.

दिग्दर्शक ऋषी श्रीकृष्ण देशपांडे म्हणतात, ‘’समायरा हा चित्रपट म्हणजे आध्यात्माचा साज चढवून आधुनिकतेच्या रंगात रेखलेला इंद्रधनुष्याचा देखावा आहे हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही. केतकी नारायण आणि अंकुर राठी ह्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि विशेष म्हणजे तरुण पिढीचा येणार उत्स्फूर्त प्रतिसाद खरंच खूप उत्तम मिळत आहे.’’

ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित ‘समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत. यात ‘समायरा’ची भूमिका केतकी नारायण साकारत असून अंकुर राठी तसच सतीश पूळेकर आणि रोहित कोकाटे निर्णायक भूमिकेत आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns