लांजा येथील भांबेड बाजारपेठेत चोरट्यांची दहशत
मिलिंद बेर्डे /लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठ येथे चोरट्यांची दहशत पोलिसी कायद्याला न जुमानता चोरट्यांनी चोरीचे सत्र ठेवले चालू पोलिसांनाच दिले आव्हान……….?
शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास दोन दुकानाच्या छतावरील कौले काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि सोन्याची चैन व रोख रक्कम असा सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
चार दिवसांपूर्वी भांबेड बाजारपेठेतील चार दुकानांच्या छतावरील कौले काढून चोरट्यांनी आतील १० हजार २०० रुपयांची रक्कम लंपास केली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्री भांबेड बाजारपेठ येथील अंकुश बंडबे यांचे लवांकुश इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या छतावरील कौले काढून चोरट्याने आतील रोख रक्कम ४५० आणि एक टीव्हीचा स्टॅबिलायझर चोरुन नेला.
त्याचप्रमाणे येथील प्रमोद जगन्नाथ नागवेकर यांच्या सोन्याच्या दुकानात प्रवेश करत रोख रुपये २८०० आणि अर्धा तोळ्याची सोन्याची चेन असा एकूण सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
लांजा तालुक्यानंतर भांबेड बाजारपेठ ही झपाट्याने शहरीकरणाकडे वाटचाल करत असून येथे परजिल्ह्यातून व परराज्यातून अनेक लोक येत असतात पण परराज्यातून आलेल्या लोकांना येथे सहजरित्या राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांची कोणतीही चौकशी ना पोलीस स्टेशन ना ग्रामपंचायत यांना दिली जात नाही भांबेड गावामध्ये वाडी वस्ती वरती राजरोसपणे परजिल्ह्यातून तसेंच परराज्यातून आलेले व्यापारी यांच्यावर कोणतेही बंधन नाही. ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीत कोणीही पर जिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यापारी येथे व्यापार करण्यासाठी आला असता त्याने प्रथम ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी असा ठराव एक मताने करण्यात झालेला असला तरी हा ठराव ग्रामपंचायत अमलात कधी आणणार…?
चोरीच्या या घटनांनी व्यापारी वर्गात तसेच वाडी वस्तीवरही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान ग्रामस्थांमधून केले जात आहे.