जग २१ व्या शतकाकडे तर मी रहात असलेल्या खेडेगावात एसटी सुद्धा नाही – दिग्दर्शक अर्जुन गुजर

सचिन चिटणीस…..
जग २१ व्या शतकाकडे तर मी रहात असलेल्या खेडेगावात एसटी सुद्धा नाही – दिग्दर्शक अर्जुन गुजर

६ मे ला जी. बी. एंटरटेनमेंट निर्मित ‘लगन’ हा चित्रपट येतोय ‘तुम्हाला वाटतंय पण सोप्प नाय’ या टॅग लाईनचा नक्की अर्थ काय, असे दिग्दर्शक अर्जुन गुजर यांना विचारले असता……
मी जेव्हा चित्रपट व्यवसाय करण्याचे ठरवले तेव्हा माझे गाव नालगुंडी, तालुका पाटोदा जिल्हा बीड पाचशे लोकवस्तीचे होते खूपच खेडेगाव होते. आज सुद्धा माझ्या गावात फक्त पंधराशे लोकवस्ती आहे व या गावात एसटी सुद्धा येत नाही. इंटरनेटचे तर काय विचारायलाच नको, अशा ठिकाणी एक व्यक्ती फिल्म मेकिंगचा व्यवसाय सुरू करायचं म्हणते आहे तर ही गोष्ट लोकांना पचायला खूपच जड जात होती, कारण आजही तिथे खाण्यापिण्याचे वांदे आहेत. या २१ व्या शतकात जग कुठल्या कुठे गेलेले आहे तर मी ज्या खेडेगावात राहतो तिथे साधी एसटी सुद्धा येत नाही आणि अशा ठिकाणी मी चित्रपट बनवायची स्वप्न बघत होतो

पाचवीत असताना मला नाटकामध्ये एक चार दोन मिनिटाचे अशी छोटीशी भूमिका दिली होती नाटका नंतर लोकांना तसेच मला सुद्धा फार आवडलं आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली त्यानंतर मी सहावीत प्रवेश केला, तेव्हा वाचनात मला एका मासिकात असे छापून आले होते की मुंबईला गेल्यावर चित्रपटात काम करायला मिळते. मग माझ्या डोक्यात किडा वळवळू लागला मी आमच्याच गावातील एकाची सायकल चोरली ती विकली आणि ते पैसे घेऊन मुंबईला जायला निघालो पण जाता जाता मी माझ्या एका मित्राला सांगितले होते मी मुंबईला चित्रपटात काम करण्यासाठी जात आहे हे कोणाला सांगू नकोस पण त्याने तातडीने आमच्या घरच्यांना कळवलं, घरचेही त्याच तातडीने मला निम्म्या रस्त्यात शोधून भर रस्त्यातून मारत मारतच घरी परत आणले त्यानंतर मग काही काळ मी शांत होतो सहावीत गेल्यावर मला  बऱ्यापैकी सेकंड लीडच्या भूमिका मिळू लागल्या लोकांच्या प्रतिक्रिया देखील चांगल्या मिळू लागल्या मग मी नाटकामध्ये काम करतच गेलो आणि मला प्रेरणा मिळाली की मला कलेमध्ये काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर मला सिनेमाचं वेड लागल. मला आठवत असलेल्या माझा पहिला पिक्चर ‘दिलवाले’ अजय देवगणचा…..
या चित्रपटात अजय देवगण खूप भारी फायटिंग करायचा त्याच्या या फायटिंगच्या मी प्रेमातच पडलो आणि तेव्हा पासून मला अजय देवगण आवडायला लागला. हळूहळू मला अजय देवगण मधील सर्वच कला आवडायला लागल्या.

तेव्हा गावाकडे व्हिडिओ वर चित्रपट लागायचे एका चित्रपटाचे दोन रुपये तिकीट असायचे पण माझ्याकडे तेव्हा दोन रुपये नसायचे कधी एक रुपया जमा झाल्यास थिएटरच्या बाहेर जाऊन उभं राहायचं एक रुपया असल्याकारणाने थेटरचा मालक अर्धा पिक्चर आम्हाला फक्त कानाने ऐकवत बाहेर उभा करून ठेवायचा व अर्धा पिक्चर आत मध्ये येऊन डोळ्याने बघायचा कारण आमच्याकडे तेव्हा पूर्ण पैसे नसायचे त्यामुळे मी असे कितीतरी चित्रपट अर्धे ऐकलेत तर अर्धे बघितलेले आहेत चित्रपटाची आवड निर्माण होण्याचे कारण मला वाटते अजय देवगण असावेत. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे घरात माझं हे चित्रपट वेड परवडणारं नव्हतं त्यामुळे मला घरातून या गोष्टीला प्रखर विरोध होता कुठेतरी काम करून चार पैसे मिळवा चित्रपटात काय ठेवलं नाही आहे असे सारखे सांगितले जायचे.
मात्र मला सिनेमा शांत बसू देत नव्हता मी कोल्हापूरला जिथे कामाला होतो तिथे आजूबाजूचे जीवन मी बघत होतो व मला असं माझ्या मनात कुठेतरी वाटायला लागले की हे सगळे आपण लिहिले पाहिजे आणि मी लिहावयास लागलो त्यातूनच मी एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाचे रूपांतर सिनेमामध्ये झाले आणि या पुस्तकाचा सिनेमा करायचे ठरले मग त्यासाठी सिने तंत्राची ओळख, कॅमेरा कसा हाताळायचा, सिनेमा संबंधी बरच काही शिकत गेलो मग त्यानंतर सिनेमा बनवण्यासाठी निर्मात्यांची शोधाशोध सुरू झाली बरं मला सिनेमा बनवायचा होता तो खूप मोठ्या स्केलवर बनवायचा होता त्यासाठी भरपूर पैसे लागणार होते पण लोक माझी गोष्ट ऐकून घ्यायचे मात्र कोणीही निर्माता माझ्या गोष्टीचा चित्रपट बनवण्यास तयारच होत नव्हता मग एक दिवस असाच मित्रांबरोबर बसलेलो असताना त्यांना माझी ही व्यथा सांगितली. मित्रांनी माझी कथा ऐकली आणि ते म्हणाले कशाला निर्माता शोधतो आम्ही सर्व निर्माते होतो आणि या चित्रपटासाठी माझें तब्बल वीस मित्र निर्माते म्हणून माझ्या पाठीमागे उभे राहिले
नवीन अभिनेते, नवीन गोष्ट, नवीन कथा, नवीन निर्माते, नवीन दिग्दर्शक असं सगळं नवीन संसारा सारखंच होतं आणि याची सांगड घालणं खूपच कठीण होत पण हे सर्व आम्ही पूर्णत्वास नेले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री स्मिता तांबे यांना या चित्रपटात घ्यायचे ठरले त्यांचा चित्रपट व्यवसायातील अनुभव खूप मोठा होता आणि त्याचा फायदा मला खूपच झाला. जुन्या ना बघून मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो तर नवीन लोकांकडून मला खुप प्रेरणा मिळाली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns