डिसेंबर हा उत्साहाचा आणि उत्सवांचा महिना. मस्त थंडगार वातावरण असतं आणि वर्षअखेर जवळ आली असते. सुट्ट्या असतात आणि लोकांना सेलिब्रेशन चे वेध लागले असतात. हे लक्षात घेऊनच २१ आणि २२ डिसेंबर या दोन दिवशी विविधरंगी उपक्रम असणारं दादर कार्निवल शिवाजी पार्क येथील मुन्सिपल जिमखाना येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे..
दादर कार्निवल ही संकल्पना राबवणारी आयोजक आणि तरुण उद्योजिका मनाली कामत म्हणाली की दादर मध्ये मुळातच प्रचंड उत्साह इथल्या लोकांमध्ये प्रचंड कलागुण आहेत. पण या सगळ्याला एकत्र करेल आणि त्याचा आनंद इतरांना मिळेल असं व्यासपीठ नव्हतं. ते यानिमित्ताने आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. यात लहानापासून मोठ्यांना वर्षअखेर प्रचंड धम्माल करत साजरी करायला दोन दिवस हक्काचं ठिकाण मिळणार आहे.
गेल्या वर्षी ठिकठिकणाहून जवळपास २० हजार लोकांनी या कार्निवल मध्ये सहभाग घेतला होता. काळाघोडा फेस्टिवल, मोठ्या मैदानावर होणारी प्रदर्शन, पार्ले महोत्सव या सारख्या उपक्रमासारख पण स्वतचं वेगळेपण जपणारं आणि प्रत्येकाला आपलं वाटावं असं काही तरी दादर मधे व्हावं असं वाटतं होतं आणि त्यातूनच दादर कार्निवल ही संकल्पना जन्माला अली असं देखील मनाली कामत हिने सांगितलं. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी किती तरी अधिक करमणुकीची यात भर घातली आहे. शिवाय इथे कोणतेही प्रवेश शुल्क नसल्याने कोणीही कितीही वेळ यात सहभागी होऊ शकेल हे विशेष.
दादर कार्निवलमध्ये नेमकं काय असेल
१) वेगवेगळ्या पद्धतीची शाकाहारी, मांसाहारी आणि विविध डेझर्ट्सची खाद्यजत्रा
२) घरगुती आणि छोट्या उद्योजकांना बाजारपेठ (स्टॉल्स)
३) सेलेब्रिटी कॉर्नर
४) मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अनोख्या स्पर्धा
५) कराओकेवर गाण्याचा खुला मंच
६) सेलेब्रिटी मुलाखती आणि गप्पा
७) सांस्कृतिक कार्यक्रम
८) झुंबा आणि गाण्यावर नृत्य करायची संधी
९) विविध विषयांची मुलांसाठी खास शिबिरं
१०) खुली फोटोग्राफी स्पर्धा
११) फॅशन शो
१२) कलागुण दाखवायला मुक्त व्यासपीठ
१३) लाईव्ह संगीत
१४) ग्रीन प्रोजेक्ट : झाडं लावायची अनोखी संकल्पना
१५) टॅलेंट हंट
१६) सेल्फी बूथ
आणि भरपूर बक्षिसं…. .
खास सेलेब्रिटी कॉर्नर…….
या कार्निवलच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मेघना एरंडे, सविता मालपेकर, सीमा देशमुख, मंगल केंकरे इत्यादी मराठी अभिनय क्षेत्रातील मंडळींचे देखील इथे स्टॉल्स वर बसलेली पाहायला मिळतील. यातील कोणाच्या स्टॉलवर हस्त व्यवसायाचे नमुने पाहायला मिळतील तर कोणाच्या स्टॉल वर खास त्यांच्या हातच्या मेजवानीची चव चाखता येईल.
रंगांचा वापर करून सजवलेले स्टॉल्स, दिव्यांची अनोखी योजना, लाईव्ह म्युझिक, भन्नाट चवीचे पदार्थ, रंगतदार रसरशीत वातावरण आणि खूप सारी धमाल असणारं हे सुगी दादर कार्निवल लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना २१ डिसेंबर आणि २२ डिसेंबर हे दोन दिवस शिवाजीपार्क येथील म्युन्सिपाल जिमखाना येथे धमाल आनंद घेऊन येणार आहे.
संपर्क : मनाली कामत : +918928387827