अशोक सराफ, सुभाष सराफांचा ‘सफरनामा!’

आपले गुरु व मामा गोपीनाथ सावकार यांचेकडून एकलव्याप्रमाणे अभिनयकला शिकत स्वतःला अधिक समृध्द केले! तसेच वक्तशीरपणाचा धडा डाँ श्रीराम लागू यांचेकडून कसा मिळाला?

अशा अनेक आठवणी,अनुभवाची शिदोरी  प्रख्यात अभिनेते अशोक सराफ यांनी *सराफांचा सफरनामा* या अनोख्या कार्यक्रमात खुली केली! सोबत त्यांचे बंधू सीए सुभाष सराफ यांनी  आपले क्षेत्रातील अनुभव कथन करताना बंधू अशोक सराफ यांचेबाबत बोलण जास्त पसंत केले , अनेक अनसुने किस्से सांगितले!

सारस्वत ग्लोबल चेम्बर्स ऑफ कॉमर्स संस्थे तर्फे “ सराफांचा सफरनामा ” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन  दादरच्या सावरकर स्मारकात नुकतेच करण्यात आलेहोते .

दोन सख्खे भाऊ… दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे… दिसायला, स्वभावाने, त्यांची कार्यक्षेत्र ही वेगळी आणि दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रचंड बिझी. पण तरीही त्यांच्यातला समान दुवा म्हणजे दोघांचाही एकमेकांवर प्रचंड जीव.

बालपणातले प्रत्येक क्षण दोघांच्याही मनात आजही तसेच्या तसे जिवंत आहेत आणि आणि त्या धाग्याने त्या दोघांनाही एकमेकांशी घट्ट बांधून ठेवलेले आहे.

त्यांच्या आठवणी, जुने नवे किस्से, कधी विनोदी प्रसंग तर कधी हळवे क्षण यांनी ही मैफिल अगदी मस्त रंगली . मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला मनापासून दाद दिली. वैष्णवी कानविंदे- पिंगे नी रंगमंचावर या दोन भावांशी संवाद साधला.

आपली कला पाहण्यासाठी  रसिक येतात, त्यांना पुरेपुर कलानंद देणे ही आपली जबाबदारी समजणारे अशोक सराफ यांनी आपल्या कारकीर्दीतील अनेक किस्से दिलखुलासपणे कथन करताना आपण सारस्वत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले तर त्यांचे भाऊ सुभाष सराफ यांनी सारस्वत आरक्षण मागत नाहीत असंही नमूद केलं

दोघा भावांनी आपल्या कारकीर्दीची जडणघडण आणि आपण निवडलेल्या व्यवसायाप्रती जपलेली आत्मियता व यशस्वितेचे मर्म याप्रसंगी सांगितले!

भूमिकेत असताना हसण्यावर बंधन महत्वाचे कसे हे   विनोदाचे बादशाहा खुद्द अशोक सराफ यानी सांगितल!  ते म्हणाले,

माणसाला रडविणे सोप्पे असते , मात्र त्याला हसविणे तेवढे सोप्पे नसते . रडविण्यासाठी वातावरण निर्मिती असते , डोळ्यात कृत्रिम अश्रू आणता येतात , पार्श्वसंगीत असते व अन्य घटक असतात , त्याने कलाकाराला प्रेक्षकांना रडविणे सोप्पे असते मात्र त्याच प्रेक्षकांना खळखळून हसविणे मात्र फार अवघड बाब आहे . म्हणून विनोद करणारा व्यक्ती म्हणजे ग्रेट कलाकार नसून ती एक ग्रेट व्यक्ती असते , अशा शब्दात  अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

 

*“ चित्रपटसृष्टीत “ मामा ”  कसा बनलो !*

सुभाष सराफ यांनी सांगितले कि , सन 1986 मध्ये “ छोटी बडी बाते ” मालिकेत  मध्ये सुलभ देशपांडे , आशुतोष गोवारीकर यांच्या सोबत अशोक ने मामा ची भूमिका केली अन “ मामा ” ची सुरुवात झाली . त्या नंतर दोन—तीन भूमिका मामा च्या केल्याचे अशोक यांनी सांगितले . अशोक आणि अशोक साहेब यांच्या मधील मध्य मार्ग म्हणजे “ मामा ” होय . सेट वरील अनेकांना मग मामा म्हणणेच प्रशस्त वाटत असे . माझ्या नावात “ जी ” आला असता तर मी परका झालो असतो , आपलासा वाटलो नसतो .

*नाना शी मैत्री*

नाना पाटेकर सोबतची मैत्री म्हणजे आयुष्यभराची साथ असल्याचे अशोक सांगतात . आमच्या मैत्रीतील अनेक किस्से आजवर कोणालाही माहिती नसल्याचे सांगून अशोक यांनी काही आठवणी सांगितल्या . हमिदाबाई ची कोठी च्या वेळी नवीन व काही आर्थिक अडचणीत असणाऱ्या नाना ने माझ्या कडे 3000 हजर रुपये हात उसने मागितले . पैसे द्यायला विसरल्यावर घाईत सही करून कोरा चेक दिल्यावर नाना ने फक्त तीनच हजर रुपये घेतले आणि परत करताना मी राहू दे सांगितल्यावर नाना ने , “ मला घेतलेले पैसे परत देण्याची सवय राहू दे ” हे सांगितलेले वाक्य आजही स्मरणात असल्याचे सांगितले . तर सेटवर वेळ घालविण्या करिता एक दोन रुपयांचे पैसे लावून पत्ते मी नाना सोबत खेळलो मात्र मी नेहेमी हरत असे आणि नाना जिंकत असे . मात्र त्यात आर्थिक चणचण असणाऱ्या नाना ला काही पैसे मिळावेत ही भावना होती असे अशोक म्हणाले .

*फुटकळ आणि न चाललेल्या अशोक यांच्या चित्रपटा मागील रहस्य!*

सुभाष यांनी अशोक ने केलेल्या काही चित्रपटा बद्दल एक गुपित उघड केले . अशोक ने काही हिट चित्रपट दिल्या नंतर अनेक सुमार असलेले चित्रपट केले की जे चालले नाहीत . अनेकांना प्रश्न पडला की त्याने असे चित्रपट का केले ? मात्र कोणालाही याबद्दल काही समजले नाही .

मात्र कोल्हापुरात  अशोक सोबत अनेक जण काम करीत असत . त्यांच्याकडे फारसे पैसे नसत , अनेकांचे रोजगार व पोट त्या सिनेमांवर होते . आपल्या सोबतच्या सर्वांचे पोट भरलेले राहू दे , अनेकांच्या हाताला सतत काम मिळू दे , कोल्हापूर कडील निर्मात्यांना स्थानिक ठिकाणीच निर्मिती करून कमी पैशात चित्रपट निर्मिती व्हावी म्हणून अशोक ने कोणतेही आढेवेढे न घेता असे अनेक चित्रपट मुद्दामहून केल्याच्या आठवणी सुभाष यांनी सांगून अशोक ला स्वतःचा करिअर पेक्षा त्याच्या सर्व साथीदारांची असलेली चिंता सतावत असल्याचे नमूद केले .

2 मे 1975 रोजी “ पांडू हवालदार ” च्या चित्रपटगृहात घडलेली आठवण सुभाष यांनी सांगितली . आम्ही दोघांनी चित्रपट पाहण्यासाठी गेलो असता फारसे कोणीही लक्ष दिले नाही . मध्यांतरापर्यंत आमच्याकडे बघून थोडी कुजबुज झाली! मात्र चित्रपट संपल्यावर बाहेर पडताक्षणी लोकांनी अशोक ला घेरले . अवघ्या  3 तासात मिळालेले यश आणि प्रसिद्धी तेव्हा अनुभवली ..

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शल्यविशारद डॉक्टर रामाणी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, शामराव विठ्ठल बँकेचेअध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, उपाध्यक्ष उदय गुरकर,एनकेजीएसबी बँकेचे संचालक राजन भट ,गोव्याचे उद्योजक अनिल खवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत विशारद श्रध्दा सिद्धार्थ सिनकर यांनी सुरेल गीताने केली. तर प्रास्ताविक उद्योजक श्रीयांस कानविंदे यांनी आणि चेंबरचे संचिलक अमित पंडित यांनी आभार व्यक्त केले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns