सचिन चिटणीस….
***कोरोनाचा धोका वाढला, काळजी घ्या***
मुंबईत ९० टक्के रुग्ण सोसायट्यांमध्ये,
मुंबई महानगरपालिकेकडून सोसायट्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी.
गृहविलगीकरण आता १७ दिवस.
घराबाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हजचा वापर करावा.
सोसायटीत वावरतांना मास्क घालणं अनिवार्य.
लहान मुलं व जेष्ठांनी विनाकारण बाहेर पडू नये.
दोन व्यक्तींनी ६ फूट अंतर राखून संवाद साधावा.
सोसायटी मधील वेटिंग रूमचा वापर करू नये.
सोसायटीतील दरवाजे व हँड रेलिंग ला हाथ लावू नये.
लिफ्टची बटणे दाबतांना कागदी कपट्यांचा वापर करावा.
बाहेरील व्यक्तीला सोसायटीत थेट प्रवेश करू देऊ नये.
मदतनीस वाहन चालक व कर्मचाऱ्यांचे तापमान तपासावे.
पार्सल थेट सोसायटीमध्ये न घेता , आधी निर्जंतुकीकरण करावे.
बाहेर पडतांना निर्जंतुकीकरण करूनच वाहनांना हाथ लावावा.
*घरात वावरत असतांना देखील शक्यतो जेवावयास बसतांना समोरासमोर न बसता भारतीय पद्धतीचा ( पंगत ) वापर करा. त्याच प्रमाणे जेवण करतांना फारसे बोलू नका.*
*ज्या लोकांच्या घरात विलगीकरणा साठी जागा नाही अशांसाठी महापालिकेने संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत.*
* मुंबई महानगरपालिकेने बेडची संख्या १२९०६ वरून १५९७१ वर केली, सात दिवसांमध्ये अजून तीन हजार बेड वाढवणार. यात ४०० ICU बेडचा समावेश असणार.*
कार्यालयासाठी व दुकानदारांसाठी नियमावली…..
*कार्यालयात एकट्यानेच डबा खावा
*बाजारात खरेदीसाठी जाताना शक्यतो एकाच व्यक्तीने जावे.
*दुकानांमध्ये गर्दी असल्यास प्रवेश करू नये.
*प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करू नका
* खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतीचा वापर करा
*खरेदी केलेल्या वस्तू काही काळ घराबाहेर ठेवाव्यात
*दुकानदारांनी मास्कन घातलेल्यानां प्रवेश देऊ नये
*दुकानांमध्ये मर्यादीत मदतनीस नियुक्त करावे
*व्यवहारासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा
*सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर असायला हव
*आळीपाळीने / गरजेनुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवा
*शारीरिक तापमान मोजण्याची यंत्रणा उपलब्ध असावी
*मीटिंग साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धत वापरावी
*कामकाजामध्ये डिजिटल पद्धतीचा उपयोग करावा
*हवा कायम खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.