‘बघायलाच हवे असे’ ‘पाहिले न मी तुला’

सचिन चिटणीस …

‘बघायलाच हवे असे’ ‘पाहिले न मी तुला’

‘ पाहिले न मी तुला ‘ नाही नाही हे जरी या नाटकाचे नाव असलं तरी तुम्ही हे नाटक बघायलाच हवं! तुम्ही म्हणाल एवढं काय आहे या नाटकात आपल्या सर्वांच्या घरात घडणारी गोष्ट आहे आणि ती खुसखुशीत अशा विनोदाने मांडण्यात आलेली आहे. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांनी सुद्धा हे बघावे, ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी सुद्धा बघावे तसेच ज्यांचे लग्न होऊन काही वर्ष होऊन गेले असतील त्यांनी सुद्धा बघावे त्यांना नक्कीच आपल्या लग्नानंतरची पाच सहा वर्ष आठवतील व ते खळखळून हसतील त्यांना आपलाच संसार समोर चाललाय असे वाटेल.

या नाटकाला मी पैसा वसूल हे नाटक म्हणणार नाही कारण तुम्ही ज्या क्षणी या नाटकाचे तिकीट काढाल त्या क्षणी तुमचा पैसा वसूल झालेला असेल व नंतरचे दोन तास तुम्ही फक्त इंटरेस्टवर इंटरेस्ट मिळवत जाल.

ह्या नाटकातील पात्र समोर बसलेल्या प्रेक्षकांशी मध्ये बोलतात आणि त्यामुळेच प्रेक्षक नाटकाशी जास्त डिलीट होतात जणू काही आपणच त्या नाटकात काम करतो आहोत असे प्रेक्षकांना वाटते.

नाटकाची गोष्ट तशी साधी व सरळ आहे लग्न झाल्यानंतर दोन-तीन वर्षांनी नवरा बायको मध्ये ज्या छोटया मोठया कुरबुरी सुरू होतात, आणि मग ‘संसार’ नावाचा खेळ हळूहळू सुरू होतो. पूर्वी नजरेने एकमेकांशी संवाद साधणारे आता शब्दांमधेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.

अंशुमन विचारे आणि सुवेधा देसाई यांची जोडी एकदम झक्कास. अंशुमनच्या अभिनयाबद्दल बोलाल तर क्या बात है. अंशुमनने या नाटकात नेहमीपेक्षा वेगळा रोल केला असून अभिनयाची एक वेगळीच उंची गाठली आहे. सुवेधा देसाईने अंशुमनला उत्तम साथ दिली असून काही काही प्रसंगात तिने आपल्या अभिनयाची चुणूक  दाखवली आहे. भरभर बोलण्याचा एक जो प्रसंग आहे तो तिने अतिशय उत्तम रित्या केला असून हमखास तिला त्या प्रसंगासाठी प्रेक्षकातून वाहवा व टाळ्या मिळतात.

हेमंत पाटील याने अंशुमनचा मित्राचा रोल केला असून त्याची साथही खूप महत्त्वाची आहे, आणि त्याने ती पूर्ण विश्वासाने केलेली आहे.

 

प्रेमविवाहानंतर प्रत्यक्ष संसार करताना नवरा-बायकोत नेमकं काय बिघडत जातं याचा वेध घ्यायचा प्रयत्न लेखक – दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी केला आहे. सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.

नाटकांमध्ये एकच गाणं असून ते टायटल सॉंग अतिशय सुरेल झाले आहे.

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns