नुकतीच एका नाटकाच्या निमित्ताने एका ‘तरुण’ कलाकाराची भेट झाली. त्याचा उत्साह, चेहऱ्यावरचा आनंद नुसता ओसंडून वाहत होता. कधी एकदा हे नाटक प्रेक्षकांसमोर सादर करतोय याचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
त्याचे वय होते अवघे ८० वर्ष हो तुम्ही वाचताय ते अगदी बरोबर आहे. त्यांचे नाव आहे बाळासाहेब धुरी अर्थात बाळ धुरी. एकेकाळी आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावणारे बाळासाहेब आजही अगदी टवटवीत दिसत होते. २००४ साली केलेले शेवटचे नाटक चंद्रलेखाचे ‘पहाट वारा’ ते आज २१ वर्षानंतर करत असलेले पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘गंगा यमुना सरस्वती’ हे नाटक. या नाटकात कोर्टरूम ड्रामा असून १४ कलाकारांनी २४ भूमिका बजावल्या आहेत. टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रसिका वेंगुर्लेकर हिची या नाटकात प्रमुख भूमिका आहे. लालासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे या नाटकाचे निर्माते आहेत.
या नाटकाचा शुभारंभ प्रयोग १ मे रोजी पुण्यात होत असून ३ मे रोजी मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग यशवंत नाट्यमंदिर मध्ये होणार आहे.
विविध भाषांमध्ये बातमी वाचण्यासाठी वरील Click to Translate Language ला क्लिक करा