*एअरटेलने स्पॅम शोधण्यासाठी भारतातील पहिले एआय संचालित नेटवर्क सोल्यूशन सादर*
*एआय सोल्यूशन रिअल टाइम आधारावर 1 ट्रिलियन रेकॉर्डवर प्रक्रिया करते. दररोज 100 दशलक्ष स्पॅम कॉल आणि 3 दशलक्ष एसएमएसना चिन्हांकित करते*
*मुंबई, सप्टेंबर 25, 2024:* देशातील स्पॅमच्या समस्येला आळा घालण्यासाठी भारती एअरटेलने (“एअरटेल”) आज भारतातील पहिले नेटवर्क आधारित, एआय संचालित स्पॅम शोधण्यासाठी समाधान सादर केले जे आपल्या ग्राहकांसाठी स्पॅम कॉल आणि संदेशांच्या समस्येचे लक्षणीय निराकरण करेल.
टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने देशातील अशा प्रकारचे पहिलेच समाधान सादर केले आहे, हे टूल ग्राहकांना सर्व संशयित स्पॅम कॉल आणि एसएमएसला रिअल टाइममध्ये सतर्क करेल. हे समाधान विनामूल्य आहे आणि सर्व एअरटेल ग्राहकांसाठी सेवा विनंती न करता किंवा अॅप डाउनलोड न करता आपोआप सक्रिय होईल.
*भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल म्हणाले,* ‘स्पॅम ग्राहकांसाठी धोकादायक बनले आहेत. हे सर्वोतपरी सोडविण्यासाठी आम्ही गेले बारा महिने यावर संशोधन केले आहे. आज आम्ही देशातील पहिले एआय संचालित स्पॅम मुक्त नेटवर्क सादर करत आहोत जे आमच्या ग्राहकांना घुसखोर आणि अवांछित संप्रेषणांच्या सतत आक्रमणापासून वाचवेल”.
*गोपाल विठ्ठल* यांनी असेही सांगितले की”ड्युअल-लेयर प्रोटेक्शन म्हणून डिझाइन केलेल्या या समाधानामध्ये दोन फिल्टर आहेत – एक नेटवर्क लेअरवर आणि दुसरा आयटी सिस्टम लेअरवर. प्रत्येक कॉल आणि एसएमएस या ड्युअल लेयर्ड एआय शील्डमधून जातो. 2 मिलीसेकंदात आमचे समाधान दररोज 1.5 अब्ज संदेश आणि 2.5 अब्ज कॉलवर प्रक्रिया करते. हे एआयच्या शक्तीचा वापर करून रिअल टाइम आधारावर 1 ट्रिलियन रेकॉर्डवर प्रक्रिया करण्यासारखे आहे. आमचे समाधान दररोज उद्भवणाऱ्या 100 दशलक्ष संभाव्य स्पॅम कॉल आणि 3 दशलक्ष स्पॅम एसएमएस यशस्वीरित्या ओळखण्यास सक्षम आहे. आमच्यासाठी ग्राहकांना सुरक्षित ठेवणे हे ज्वलंत प्राधान्य आहे.
एअरटेलच्या डेटा शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या एआय संचालित समाधानामध्ये कॉल आणि एसएमएसला “संशयित स्पॅम” म्हणून ओळखण्यासाठी आणि वर्गीकृत करण्यासाठी प्रोप्रायटरी अल्गोरिदमचा वापर केला जातो. अत्याधुनिक एआय अल्गोरिदमद्वारे संचालित नेटवर्क कॉलर किंवा पाठवणाऱ्याच्या वापर करण्याची पद्धती, कॉल / एसएमएस फ्रिक्वेन्सी, कॉल कालावधी अशा विविध मापदंडांचे रिअल टाइम आधारावर विश्लेषण करते. ज्ञात स्पॅम पॅटर्नविरूद्ध या माहितीचा क्रॉस-संदर्भ देऊन, सिस्टम संशयित स्पॅम कॉल आणि एसएमएस अचूकपणे चिन्हांकित करते.
याव्यतिरिक्त, हे समाधान ग्राहकांना एसएमएसद्वारे प्राप्त दुर्भावनापूर्ण लिंकबद्दल देखील सतर्क करते. यासाठी एअरटेलने ब्लॅकलिस्टेड यूआरएलचा सेंट्रलाइज्ड डेटाबेस तयार केला असून संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून युजर्सना सावध करण्यासाठी अत्याधुनिक एआय अल्गोरिदमद्वारे प्रत्येक एसएमएस रिअल टाइममध्ये स्कॅन केला जातो. हा उपाय वारंवार आयएमईआय बदलांसारख्या विसंगती देखील शोधू शकतो जे फसवणुकीच्या वर्तनाचा एक सामान्य सूचक म्हणून धरले जाते. या संरक्षणात्मक उपायांचा थर लावून, कंपनी आपल्या ग्राहकांना स्पॅम आणि फसवणुकीच्या धोक्यांच्या विकसनशील लँडस्केपविरूद्ध जास्तीत जास्त संरक्षण मिळेल याची खात्री करीत आहे.
*संपादकांसाठी टीप*
भारत सरकारने सेवा आणि व्यवहार कॉलसाठी 160 प्रेफिक्ससह 10 अंकी क्रमांक निश्चित केले आहेत. बँका, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, स्टॉक ब्रोकर्स, इतर वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स, एंटरप्रायजेस, एसएमई, व्यवहार आणि सेवा कॉल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आणि लहान व्यवसायांना देण्यात आलेल्या या 160-प्रेफिक्स सीरिजमधून ग्राहकांना कॉल येण्याची अपेक्षा आहे.
*याव्यतिरिक्त, ज्या ग्राहकांनी डू-नॉट-डिस्टर्ब (डीएनडी) चा पर्याय निवडला नाही आणि प्रमोशनल कॉल प्राप्त करण्यासाठी सबस्क्रायब केले आहेत त्यांना 140 प्रेफिक्स असलेल्या 10 अंकी क्रमांकावरून कॉल प्राप्त होत राहतील.*